________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दुसरा, पान ५२.
Paeeeeeeeeheave
ह्मणून, जर कारण असेल तर त्याच्या योग्यतेप्रमाणे काये उत्पन्न होते. कारण नसल्यास काय उत्पन्न १ होणे शक्य नाही, हे अर्थातच सिद्ध आहे.
उप्तं बीजं शुभं भूमौ सहस्रगुणितं फलम् ।
ऊषरेऽसंस्कृते देशे बीजमुप्तं विनश्यति ॥४॥ अर्थ- कोणतेही चांगले बी, चांगल्या जमिनीत पेरले असता, तें सहस्रपटीने फल देते. आणि ४ तेच बी जर न कसलेल्या जमिनीत अथवा एखाद्या उकिरड्यांत पेरले, तर त्या बियाचाच नाश होतो.
गुरूपदेशतो लोके निर्ग्रन्थपदधारणम् ॥
संयमः कथ्यते सद्भिः शरीरे सँस्कृतेऽस्ति सः ॥५॥ 8 अर्थ- गुरूच्या उपदेशाने निग्रंथपदाचे जे धारण करणे त्याला ह्या जगांत चांगले लोक संयम, असे ह्मणतात. तो संयम, जर शरीर संस्कृत झणजे शुद्ध असेल तरच असतो.
पापवृक्षस्य मूलघ्नं संसारार्णवशोषणम् ॥
शिवसौख्यकरं धर्म्य साधकः साधयेत्तपः ॥ ६॥ , अर्थ- पापरूपी वृक्षाच्या मूलाचा नाश करणारे, संसाररूपी समुद्राला अटवून टाकणारे आणि कल्याण व सुख ह्यांस (किंवा मोक्षसुखास) देणारे धार्मिकतप, साधक श्रावकानें अवश्य करावें.
OBABAVANAGAR
For Private And Personal Use Only