________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ८०.
veneres
Creser
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
प्रवर्तन्ते ता मे भवन्तु " असें ह्मणावें. (2) सङ्कल्पं सूत्रपठनं मार्जनं चाघमर्पणम् ॥ देवादितर्पणं चैव पञ्चाङ्गं स्नानमाचरेत् ॥ १०५ ॥
अर्थ- संकल्प करणें, मंत्र ह्मणणे, मार्जन करणें, अघमर्पण करणें आणि देवादिकांचं तर्पण करणें ह्या पांच क्रिया स्नानांच्या वेळीं करावयाच्या असल्यानें, स्नान है पंचांग (पांच अंगांनी युक्त असें ) आहे. तें त्याप्रमाणें पंचांगसहित करावें. ( उजव्या हातांत पाणी घेऊन, उजव्या नाकपुडीने श्वास वर ओढून डाव्या नाकपुडीनें त्या हातांतील पाण्यावर श्वास सोडावा. आणि त्या श्वासाबरोबर माझ्या शरीरांतील सर्व पातकें बाहेर गेलीं असें समजावें. ह्याला ' अघमर्पण' ह्मणतात. ) गृहस्याभिमुखं स्नायान्मार्जनं चाघमर्षणम् ॥
अन्यत्रार्कमुखो रात्रौ प्राङ्मुखोदङ्मुखोऽपि वा ॥ १०६ ॥
अर्थ - घरांत स्नान करावयाचे झाल्यास स्नान, मार्जन आणि अघमर्षण घराकडे तोंड करून करावें. आणि दुसरीकडे स्नान करणें झाल्यास सूर्याकडे तोंड करून स्नान करावे. तसेंच रात्री स्नान करणें झाल्यास पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून स्नान करावें.
सन्ध्याकाले नाकाले संक्रान्ती ग्रहणे तथा ॥ वमने मद्यमांसास्थिचर्म स्पर्शे ऽङ्गनारतौ ॥१०७॥ अशौचान्ते च रोगान्ते स्मशाने मरणश्रुतौ ॥ दुःस्वप्ने च शवस्पर्शे स्पर्शनेऽन्त्यजनेऽपि वा १०८०
cred
For Private And Personal Use Only