________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ८१. स्पृष्टे विमूत्रकाकोलूकश्वानग्रामस्करे ।। ऋषीणां मरणे जाते दूरान्तमरणे श्रुते ।। १०९॥ उच्छिष्टास्पृश्यवान्तादिरजस्वलादिसंश्रये ॥ अस्पृश्यस्पृष्टवस्त्रान्नभुक्तपत्रविभाजने ॥ ११॥ शुद्धे वारिणि पूर्वोक्तं यन्त्र मन्त्रे (?) सचेलकः॥कुर्यात्स्नानत्रयं जिहादन्तधावनपूर्वकम् । ११॥ अर्घ च तर्पणं मन्त्रजपदानार्चनं चरेत् ।। बहिरन्तर्गता शुद्धिरेवं स्याद्गृहमेधिनाम् ।। ११२॥ है अर्थ- आतां स्नान केव्हां अवश्य केले पाहिजे ते सांगतात--- संध्या व पूजा करण्याच्या वेळी स्नान अवश्य करावे. संक्रांति व ग्रहण आले असतां स्नान करावे. तसेंच वांति झाली असतां व मद्य, मांस, हाडे, कात. ह्यांचा स्पर्श झाला असता आणि मैथुन केले असतां स्नान अवश्य करावे. अशौचाची समाप्ति झाल्यावर आणि रोग गेल्यावर स्नान अवश्य करावे. स्मशानांत गेले असता, कोणीतरी मेलेले ऐकले असतां, वाईट स्वम पडले असतां प्रेताचा किंवा अंत्यज बगैरे लोकांचा स्पर्श झाला; असतां; विष्ठा, मूत्र, कावळा, युबड, श्वान, गांवांतील डुक्कर ह्यांचा स्पर्श झाला असतां; कोणी मुनि मरण पावल्याचे ऐकले असतां; कोणी आपला संबंधी दूरच्या गांवीं मेल्याचे ऐकिलें असतां; उष्टयाने असलेला, (भोजन केल्यावर हात तोंड धुण्याच्या आधी त्या मनुष्याला उष्टा ह्मगतात.) मनुष्य, वांति झालेला मनुष्य, विटाळशी बायको ह्यांतील कोणाचाही स्पर्श झाला असतां; ज्याला आपण स्पर्श करूं नये अशा मनुष्याने किंवा दुसऱ्या जीवाने शिवलेले वस्त्र अन्न ह्यांचा स्पर्श झाला असतां; जेवतांना पान फाटले असतां पूर्वी avasaviwwwwwwwwwwwwwwviews
For Private And Personal Use Only