________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
000003
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ५०. करून देणाऱ्या अशा श्रीजिनेंद्राच्या चरणद्वंद्वाचे दर्शन करील, तो लक्ष्मीचे क्रीडास्थान होईल. संपूर्ण पृथ्वीचें। वंशपरंपरेनें रहाण्याचे घरच असा (ज्याच्या वंशपरंपरेनें पृथ्वीपतित्वाचा अधिकार चालेल असा) होईल. कीर्तीच्या आनंदाची जागा होईल. वाग्देवतेचे क्रीडामंदिर होईल. जयलक्ष्मीच्या करमणुकीचे चांगले है साधनच की काय असा होईल. आणि सर्व महोत्सवांचे घरच की काय? असा होईल.
धन्यः स एव पुरुषः समतायुतो यः। प्रातः प्रपश्यति जिनेन्द्रमुखारविन्दम् ॥
पूजासुदानतपसि स्पृहणीयचित्त- । स्सेव्यः सदस्सु नृसुरैर्मुनिसोमसेनैः ॥ ११६ ॥ ___ अर्थ- सर्वत्र समबुद्धीने युक्त असलेला असा जो मनुष्य, प्रातःकालीं श्रीजिनेंद्राच्या मुखकमलाचें। दर्शन करतो, तो, पूजा, दान आणि तप ह्यांविषयी ज्याच्या मनाचे सर्वांना अनुकरण करावेसें, वाटत आहे असा तोच पुरुष धन्य होय. आणि तो मनुष्यांतील देव असे जे सोमसेन मुनि, त्यांनी सेवा करण्यास योग्य आहे. तात्पर्य, त्याची सोमसेनमुनि सेवा करतील. इति श्रीधर्मरसिकशास्त्रे त्रिवर्णाचारनिरूपणे भट्टारकश्रीसोमसेनविरचिते सामायिकाध्यायः प्रथमः ॥
पहिला अध्याय समाप्त.
उUA0
NewwwAASwavvvvvvvvv0eaves
For Private And Personal Use Only