________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
WPORNAMANASAAWANUANUAR
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान १७. 8 अर्थ- ह्याप्रमाणे गावापासून लांब जाऊन, गुप्त ठिकाणी जेथे जीवजंतु किडे वगेरे नाहीत अशा?
कोरड्या व विस्तीर्ण जागी लोकांना आपण दिसणार नाही अशा ठिकाणी-भूत, प्रेत, पिशाच, यक्ष, ग्राम-१ ६देवता वगैरेंच्या पूजनाचे स्थळ सोडून-मलमूत्रांचे विसर्जन करावे.
दशहस्तं परित्यज्य मूत्रं कुर्याजलाशये ॥
शतहस्तं पुरीषं तु नदीतीरे चतुर्गुणम् ॥ २१ ॥ अर्थ- एखाद्या तळ्याजवळ जर मूत्रोत्सर्गास बसण्याचा प्रसंग येईल, तर, त्या तळ्यापासून दहा : हात जागा टाकून पलीकडे बसावें. आणि शौचास बसण्याचा प्रसंग आल्यास शंभर हात जागा टाकून बसावें. हाच प्रकार नदीच्या तीरावर करण्याचा प्रसंग आल्यास चौपट (मूत्रास चाळीस हात व शौचास चारशेहे हात) जागा टाकून बसावें.
शौचनिषिद्धस्थान. हलकृष्टे जले चित्यां वल्मीके गिरिमस्तके ।। देवालये नदीतीरे दर्भपुष्पेषु शाहले ॥ २२ ॥ कूलच्छायासु वृक्षेषु मार्गे गोष्ठाम्बुभस्मसु ।। अग्नौ च गच्छन् तिष्ठंश्च विष्ठां मृत्रं च नोत्सृजेत ॥ २३ ॥
AKHANNABARADAVUUUN
For Private And Personal Use Only