________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत लैवर्णिकाचार, अध्याय दुसरा.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
पान ७०.
NNN
NANNT
ABOUT
अर्थ- सुपारी, ताड, हिंताड, केवडा, महावट (?) खजूर आणि नारळ ह्या सात झाडांना तृणराज असें नांव आहे. ह्या तृणराजांच्या काड्यांनी जो दंतधावन करतो, तो निर्दय आणि पापी होतो. ह्मणून ह्या झाडांच्या काड्या दंतधावनास घेऊं नयेत. कारण हीं काठे अनंतकायिक जीव आहेत.
द्वितीया पञ्चमी चैव ह्यष्टम्येकादशी तथा ॥ चतुर्दशी तथैतासु दन्तधावं च नाचरेत् ॥ ६८ ॥ अर्कवारे व्यतीपाते संक्रान्तौ जन्मवासरे ॥ वर्जयेद्दन्तकाष्ठं तु व्रतादीनां दिनेषु च ॥ ६९ ॥
अर्थ --- द्वितीया, पंचमी, अष्टमी, एकादशी आणि चतुर्दशी ह्या तिथींस दंतधावन करूं नये. तसेंच रविवार, व्यतीपात असलेला दिवस, संक्रांतीचा दिवस, आपला जन्मदिवस आणि व्रतांचा दिवस ह्या दिवशीं दंतधावन करूं नये.
तृणपर्णैः सदा कुर्यादेकां चतुर्दशीं विना ॥ तस्यामपि च कर्तव्यं शुष्ककाष्ठैर्जिनार्चने ॥ ७० ॥
अर्थ -- गवत आणि झाडांची पाने ह्यांच्या योगानें चतुर्दशीवाचून बाकी सर्व दिवशीं दंतधावन करावे. चतुर्दशीच्या दिवशी देखील जर जिनपूजा करावयाची असेल तर वाळलेल्या काड्यांनी दंतधावन करावें. ) [ ह्यावरून बाकीच्या ( निषिद्ध नसलेल्या दिवशीं ) दंतधावनास ज्या काड्या घ्यावयाच्या त्या ओल्या असाव्यात, असे सिद्ध होतें. ]
सहस्रांशानुदिते यः कुर्याद्दन्तधावनम् ॥ स पापी मरणं याति सर्वजीवदयातिगः ॥ ७१ ॥ ३
CAR
For Private And Personal Use Only