________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैणिकाचार, अध्याय दुसरा. पान ७७.
ANAN
222xAAAxxx
अर्थ- जे पाणी दगडावरून आपटून पडत असेल तें पाणी प्रासु (निर्जंतुक ) होय. तसेंच ? सूर्याच्या किरणांनी तापलेले, किंवा पशुंच्या पायांनी तुडविलेलं, अथवा झत्यांतून वहात असलेलें अशा प्रकारचं पाणीही प्रासुक समजावें, त्याचप्रमाणे वाळूच्या यंत्रांतून येणारे किंवा ज्याला गंधकाचा वास येत आहे तेंही पाणी प्रासुक असें समजावें. हैं पाणी फक्त स्नानाच्या मात्र उपयोगी पडते. गंधकाचा वास येत असल्याने पिण्याच्या उपयोगीं नाहीं.
मिध्यादृष्टिभिरज्ञानैः कृततीर्थानि यानि वै ॥ तेषु स्नानं न कर्तव्यं भूरि जीवनिपातिषु ॥९४॥ अर्थ - ज्ञानशून्य अशा मिथ्यादृष्टींनीं कल्पिलेलीं जीं तीर्थे असतील त्यांत स्नान करूं नये. कारण त्यांत जीवजंतु फार असल्याने त्यांची हिंसा होते.
यदि तत्रैव गन्तव्यं कुसङ्गासङ्गदोषतः ॥ तस्माध्दत्वा जलैः स्नायाद्भिन्नदेशे सुशोधिते ॥ ९५ ॥ अर्थ- जर एखाद्या दुष्टाच्या संगतीमुळे त्या तीर्थाचे ठिकाणी जाणे भाग पडलें, तर त्यांतून आपल्या स्नानाला लागणारे पाणी निराळें काढून, एखाद्या शुद्ध जाग्यांत जाऊन स्नान करावें. पञ्चेन्द्रियशवस्पर्शे विनातैलं न शुध्यति ॥ ब्रह्मचारियतीनां तु न योग्यं तैलमर्दनम् ॥ ९६ ॥ अर्थ - पचेंद्रियजीवाच्या प्रेताचा स्पर्श झाला असतां तेल अंगास लावल्यावांचून मनुष्य शुद्ध होत नाहीं. परंतु ब्रह्मचारी आणि यती ह्यांनी केव्हांच तेल लावू नये.
For Private And Personal Use Only