________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsur Gyanmandir
30000000000000000
सोमसेनकृत बैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ४४. मौक्तिकी नाममालेति पुष्पं श्वेतं च चीवरम् ॥ द्वादशागुलपर्वाणि दक्षिणावर्ततो जपेत् ॥४॥
नववारान्यतो नाशः पापस्य प्रविजायते ।। ___अर्थ- पौष्टिककर्माला नैर्ऋत्यदिशा आणि पातकाल शास्त्रकारांनी योग्य मानले आहेत. ह्या कर्माला १ कमलासन असावें. ज्ञानमुद्रा असावी. मंत्राच्या शेवटी "स्वधा" असा पल्लव असावा. चंद्रकांतमण्यासारखा रंग असावा. मोत्याची माला, पांढरे वस्त्र असावें. कोणत्याही मंत्राचा जप आपल्या हाताच्या बोटांच्या बारा पेयांनी मोजून केला असतां चालतो. ही पेरी दक्षिणावर्त (दक्षिणेकडे फेरा येईल अशा रीतीने ) मोजावीत. अशा प्रकारे नऊ वेळा (एकशेहे आठ वेळां) जप केला असतां सर्वपातकांचा नाश होतो.
तर्जन्यङ्गुष्ठयोगेन विद्वेषोच्चाटने जपः॥५॥ कनिष्ठाङ्गुष्टकाभ्यां तु कर्म शत्रुविनाशने ॥
अगुष्ठानामिकाभ्यां तु जपेदुत्तमकर्मणि ॥६॥ अर्थ- तर्जनी (आंगठ्याजवळचें वोट) आणि आंगठा ह्या दोन बोटांनी मालेतील मणि ओढून जो जप करावयाचा, तो, शत्रूच्या उच्चाटनाचा जप करावा. ह्मणजे शत्रूच्या उच्चाटनाकरितां जेव्हां) जप करावयाचा असेल देणं तर्जनी आणि आंगठा ह्या दोन बोटांनी माळेतील मणि ओढून जप करावा.)
For Private And Personal Use Only