________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पहिला.
पान ४५. Na
शेवटचें वोट आणि आंगठा ह्या दोन बोटांनी शत्रूच्या नाशाबद्दलचा जप करावा. अनामिका ( शेवटच्या बोटाच्या जवळचें बोट) आणि आंगठा ह्या दोन बोटांनी सर्वप्रकारच्या शुभकर्मात जप करावा. आणि आकर्षण करावयाच्या कर्मात आंगठा आणि मधले बोट ह्या दोन बोटांनी जप करावा,
आतां माळेचे प्रकार सांगतात.
माला सुपञ्चवर्णानां रत्नानां सर्वकार्यदा ॥
स्तम्भने दुष्टसन्नाशे जपेत् प्रस्तरकर्करान् ॥ ७ ॥
शत्रूचाटे च रुद्राक्षा विद्वेषेऽरिष्टबीजजा ॥
3232323237
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
स्फाटिकी सूत्रजा माला मोक्षार्थिनां तु निर्मला ॥ ८ ॥
अर्थ- काळा, निळा, पिवळा, पांढरा आणि तांबडा ह्या पांच रंगांच्या रत्नांची माला, सर्वकार्यांची सिद्धि करणारी समजावी. स्तंभन करावयाचे असल्यास, किंवा दुष्टाला त्रास द्यावयाचा असः ल्यास दगडांच्या खड्यांच्या योगानें जप करावा. शत्रूचें उच्चाटन करावयाचे असल्यास रुद्राक्षांची माला असावी. द्वेष उत्पन्न करावयाचा असल्यास अरिष्टवीजांची (रिठ्याची किंवा बाळंतलिंबाच्या बियांची) माला करावी. मोक्षाची इच्छा करणाऱ्यांनीं स्फटिकाची आणि सुतांत ओंवलेली माला करावी. धर्मार्थकाममोक्षार्थी जपेद्वै पुत्रजीवजाम् ॥ शान्तये पुत्रलाभाय जपेदुत्पलमालिकाम् ॥ ९ ॥
VAAAAAAAAAA
For Private And Personal Use Only