________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ४०.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ververAVNAN
अर्थ — पृथ्वीकायिक, जलकायिक, तेजःकायिक, वायुकायिक, आणि वनस्पतिकायिक असे पांच त्रस जीवः ? नित्यनिगोद आणि अनित्यगोद हे दोन जीव, आणि द्वींद्रिय, त्रींद्रिय, चतुरिंद्रिय, संज्ञिपंचेंद्रिय आणि असं ज्ञिपंचेंद्रिय असे जीवांचे एकंदर बारा भेद शास्त्रांत सांगितले आहेत. ह्यांतील प्रत्येक जीवाची हिंसा-मनानें, वाणीनें आणि शरीरानें- अशी तीन प्रकारची असल्यामुळे हिंसेचे छत्तीस प्रकार झाले. आणि त्या छत्तीस प्रकारांपैकी प्रत्येक प्रकार कृत, कारित आणि अनुमोदित असा तीन तीन प्रकारचा असल्यानें एकंदर हिंसेचे एकशे आठ प्रकार झाले.
वश्यकर्मणि पूर्वाह्नः कालश्च स्वस्तिकासनम् ॥
उत्तरा दिक् सरोजाख्या मुद्रा विद्रुममालिका ॥ ९० ॥ जपाकुसुमवर्णा च वषट् पल्लव एव च ॥
अर्थ – कोणा एखाद्याच्या वशीकरणाकरितां जर मंत्रजप करावयाचा असेल, तर तो पूर्वाह्नांत (सूर्योद यापासून पंधरा घटका कालास पूर्वाह्न अणतात. ) करावा. जप करण्याच्या वेळीं स्वस्तिकासन असावें, उत्तरेकडे तोंड करावें, कमलमुद्रा असावी, पोवळ्यांची माळ असावी, तांबडा रंग असावा, आणि मंत्राच्या शेवटी " वषट् ” असें ह्मणावें. ह्याला 'पल्लव' असें नांव आहे. आकृष्टिकर्माणि ज्ञेयं दण्डासनमतः परम् ॥ ९१ ॥
22222
For Private And Personal Use Only