________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पहिला पान २९.
Driven
2 सोंग घेतो. ( ह्मणजे जन्म घेतो. )
venereren
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
क्वचित्कान्ताश्लेषात्सुखमनुभवत्येष मनुजः । कचिद्गीतं श्राव्यं विविधवररागैश्च शृणुयात् ॥ क्वचिन्नृत्यं पश्यन्नखिलतनुयष्टीविलसितं । रतिं मन्येताहो उचितविषयो धर्मविमुखः ॥ ५८ ॥ अर्थ- हा मनुष्य एखादे ठिकाणीं प्रिययुवतीच्या गाढालिंगनापासून होणाऱ्या सुखाचा अनुभव घेतो. एखादे ठिकाणीं उत्कृष्ट अशा अनेक रागांनी मिश्र झालेलें सुश्राव्य गायन श्रवण करतो. एखाद्या ठिकाणीं ज्यांत सर्वांग हलत आहे असें सुंदर नृत्य पाहून संतोष मानतो. ह्याप्रमाणें विषयसेवनांत गढून गेल्यानें धर्माचरणाकडे मुळींच पहात नाहीं. हे मोठे आश्चर्य आहे!
कचित्कांता कमलवदना हावभावं करोति । कचित् दुःखं नरककुहरे पंचधाप्राणघातात् ॥ क्वचिच्छतं चमरसहितं दासपुम्भिः प्रयुक्तं । क्वचित्कीटो मृतभवितनौ प्राणिनां कर्मयोगात् ॥ ५९
अर्थ -- हा जीव आपल्या कर्मयोगामुळे, एखाद्या ठिकाणी जिचें मुख कमलाप्रमाणें आहे अशा स्त्रीचें स्वरूप घेऊन अनेक प्रकारचे हावभाव करतो. एखाद्या वेळी पंचप्राणांच्या नाशामुळे नरकांत दुःख भोगतो. एखादे वेळी दासजनांकडून आपल्यावर छत्रचामरें धरवितो. आणि एखादे वेळी एखाद्या प्रेताच्या शरीरांतला किडा होतो! ह्याप्रमाणें प्रातःकालीं मनुष्याने वर सांगितलेला सर्व विचार करावा. हा प्रातःकालचा विधि झाला.
For Private And Personal Use Only