Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२५-२१०) महापुराण
(५७ अनिद्रालुरतन्द्रालुर्जागरूकः प्रमामयः । लक्ष्मीपतिर्जगज्ज्योतिधर्मराजः प्रजाहितः ॥ २०७ मुमुक्षर्बन्धमोक्षज्ञो जिताक्षो जितमन्मथः । प्रशान्तरसशैलूषो भव्यपेटकनायकः ॥ २०८ मूलकर्ताखिलज्योतिर्मलघ्नो मूलकारणः। आप्तो वागीश्वरः श्रेयाञ्च्छायसोक्तिनिरुक्तवाक् ॥२०९ प्रवक्ता वचसामीशो मारजिद्विश्वभाववित् । सुतनुस्तनुनिर्मुक्तः सुगतो हतदुर्णयः ॥ २१० कल्पवृक्षासारखे आहेत. सूर्यचन्द्राप्रमाणे सर्ववस्तुद्योतक आहेत ॥ २९ ॥ धर्मराज- धर्मअहिंसा हे धर्माचे लक्षण आहे. तसेच चारित्र, रत्नत्रय, उत्तमक्षमादिक यांचे आदिभगवान् राजा आहेत ॥ ३० ॥ प्रजाहित-- त्रैलोक्यस्थित सर्व लोकाचे हितकर्ते भगवान् आहेत ॥ ३१ ॥
ममा-- घातिकर्मे व अघातिकर्मे यांनी जे रहित झाले आहेत असे प्रभु मुमुक्षु होत ॥ ३२ ।। बन्धमोक्षज्ञ-- बन्ध आणि मोक्ष यांचे स्वरूप जाणणारे प्रभु बन्धमोक्षज्ञ होत ॥ ३३ ॥ जिताक्ष- ज्यांनी सर्व इंद्रिये जिंकली आहेत ते जिताक्ष ।। ३४ ॥ जितमन्मथ
तन्यशक्तीचे मंथन करणान्या मन्मथाला-मदनाला प्रभुंनी जिंकले म्हणन ते • जितमन्मथ आहेत ।। ३५ ।। प्रशान्तरसशैलूष-- अतिशय शान्त असा जो नववा रस त्यात तन्मय झालेले भगवान् त्या रसाचे नटाचार्य आहेत ॥ ३६ ।। भव्यपेटकनायक- रत्नत्रययोग्य अशा भव्यांच्या समूहाचे प्रभु नायक-स्वामी आहेत ॥ ३७ ।। मूलकर्ता-- धर्माचे प्रथमतः स्वरूप सांगून त्याची प्रतिष्ठा करणारे। प्रभु मूल कर्ता आहेत ॥ ३८ ॥ अखिलज्योति-- सर्व जगात केवलज्ञानदर्शनरूप डोळा हा प्रभूचा आहे म्हणून ते अखिलज्योति होत ॥ ३९ ॥ मलघ्नतपाचे मल माया, मिथ्यात्व निदान हे आहेत. त्यांचा नाश प्रभूनी केला म्हणून ते मलघ्न आहेत ।। ४० ॥ मूलकारणम्-धर्माच्या अंकुराला अथवा धर्माच्या उत्पत्तीला किंवा सृष्टीला मूलकारण हे प्रभु आहेत ।। ४१ ।। आप्त-- क्षुधादिक अठरा दोषांनी रहित होऊन केवलज्ञानी जे झाले आहेत ते प्रभु आप्त होत ॥ ४२ ॥ वागीश्वर- प्रभु दिव्यध्वनीचे स्वामी आहेत ॥ ४३ ॥ श्रेयान्-- अतिशय उत्कृष्ट कल्याणस्वरूपी प्रभु आहेत ॥ ४४ ॥ श्रायसोक्ति-- मोक्षप्राप्तीला कारण अशी भगवन्ताची उक्ति-वाणी उपदेश आहे म्हणून ते श्रायसोक्ति आहेत ।। ४५ ।। निरुक्तवाक्-- निरुक्त निश्चित वस्तुस्वरूप दाखविणारे प्रभूचे वचन आहे म्हणून ते निरुक्तवाक् आहेत ।। ४६ ॥
प्रवक्ता-- अतिशय उत्कृष्ट वक्ता ।। ४७ ।। वचसामीश-- प्रभु वाणींचे स्वामी आहेत ।। ४८ ॥ मारजित्-- प्रभूनी मदनाला जिंकले म्हणून ते मारजित् आहेत ।। ४९ ॥ विश्वभाववित्-- त्रैलोक्यातील सर्व जीवांचे मनातील अभिप्राय प्रभु जाणतात म्हणून ते विश्वभावजित् आहेत ॥ ५० ॥ सुतनुः सु-- शोभन-सुन्दर तनु शरीर आहे ज्यांचे असे प्रभु सुतनु होत ।। ५१ ॥ तनुनिर्मुक्त-- प्रभु तनूने-शरीराने निर्मुक्त रहित आहेत अर्थात् सिद्धावस्थेत ते शरीररहित असतात ॥ ५२ ।। सुगत-- प्रभूचे गमनविहार करणे सुन्दर आहे म्हणून ते सुगत अथवा सु-अतिशय उत्तम गतं-केवलज्ञान प्रभूचे आहे म्हणून ते सुगत अथवा सुगा-म्हणजे पुढे जाणारी ता-लक्ष्मी ज्यांची आहे असे प्रभु सुगत होत ।। ५३ ॥ हतदुर्णय-- सर्वथानित्यच,
म. ८
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org