Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२५-२०३)
महापुराण
शान्तिनिष्ठो मुनिज्येष्ठः शिवतातिः शिवप्रदः ।
शान्तिदः शान्तिकृच्छान्तिः कान्तिमान कामितप्रदः ॥ २०२ धियां निधिरधिष्ठानमप्रतिष्ठः प्रतिष्ठितः। सुस्थिरः स्थावरः स्थास्नुः प्रथीयान्प्रथितः पृथुः ॥२०३
अनन्तज्ञानादि गुण पूर्ण प्रकट झाले आहेत म्हणून स्पष्ट आहेत ॥७३॥ स्पष्टाक्षर- ज्यांचे वर्ण स्पष्ट व कान आणि मनाला प्रिय असे आहेत ते प्रभु स्पष्टाक्षर होत ॥ ७४ ॥ क्षम- प्रभु परीषह सहन करण्यास समर्थ म्हणून त्यांना क्षम म्हणता ।। ७५ ॥ शत्रुघ्न- चार घातिकर्मांचा नाश केल्यामुळे प्रभु शत्रुघ्न आहेत ॥ ७६ ॥ अप्रतिघ- प्रतिघ-क्रोध. तो प्रभुंना नसल्यामुळे ते अप्रतिघ आहेत ।। ७७ ।। अमोघ-- प्रभु आत्मध्यानाने केवलज्ञान प्राप्त करून सफल झाले त्यांचा प्रयत्न मोघ-विफल झाला नाही ॥ ७८ ॥ प्रशास्ता-- विनेयवरान्-उत्तम मुनिशिष्यांना प्रभुंनी धर्म शिकविला म्हणून प्रभु प्रशास्ता आहेत ॥ ७९ ॥ शासिता-- प्रभु शासिता भव्यांचे रक्षक आहेत ।। ८० ॥ स्वभू-- स्वतःच स्वतःच्याद्वारे प्रभु उत्पन्न झाले म्हणून ते स्वभू आहेत अर्थात् स्वतःच स्वस्वरूपाच्या चिन्तनाने प्रभुनी जाणण्याला योग्य अशा आत्म्याचे स्वरूप जाणले म्हणून प्रभु स्वभू झाले ॥ ८१ ॥ शान्तिनिष्ठ-- शान्ति-कामक्रोधादिकांचा अभाव होणे ती शान्ति होय. निष्ठा-- त्या शान्तीत अतिशय स्थिर राहणे ती शान्तिनिष्ठा होय अर्थात् यथाख्यात चारित्रात शान्तिनिष्ठा असते. ते यथाख्यातचारित्र भगवंतांना प्राप्त झाले म्हणून ते शान्तिनिष्ठ होते ।। ८२ ।। मुनिज्येष्ठ- मुनिगणामध्ये प्रभु अतिशय श्रेष्ठ व प्रशंसनीय म्हणून मुनिज्येष्ठ ॥ ८३ ।। शिवताति- शिव-निर्वाणाची तातिः चिन्ता ज्यांना असे प्रभु शिवताति होत अथवा शिवं करोति इति शिवताति-- मोक्षप्राप्ति प्रभु भक्तांना करून देतात म्हणून प्रभु शिवताति होत ॥ ८४ ॥ शिवप्रद-- शिवं परमकल्याणं प्रददाति इति शिवप्रदः अत्युत्कृष्ट कल्याणाची प्राप्ति प्रभु भक्तांना करून देतात म्हणून ते शिवप्रद होत ॥ ८५ ॥ शान्तिदकामक्रोधादिकांचा अभावरूप शान्ति प्रभु भक्तांना देतात ॥ ८६ ॥ शान्तिकृत्- शान्ति-क्षुद्र उपद्रवांचा विनाश प्रभु कृत् करतात म्हणून ते शान्तिकृत् आहेत ।। ८७॥ शान्ति- प्रभूनी सर्व कर्माचा क्षय केला म्हणून ते शान्ति झाले ॥ ८८ ॥ कान्तिमान्- कान्ति-शोभा. ती प्रभूजवळ नेहमी आहे म्हणून ते कान्तिमान् ॥ ८९ ॥ कामितप्रद- कामितं वाञ्छित प्रभु देतात म्हणून ते कामितप्रद आहेत ।। ९० ॥
श्रियां निधि- प्रभु केवलज्ञानलक्ष्मीचे निधि-स्थान आहेत ॥ ९१ ॥ अधिष्ठानम् धर्माचा पाया असे प्रभु अधिष्ठान होत ॥ ९२ ॥ अप्रतिष्ठ- अन्यांच्याद्वारे प्रतिष्ठा ज्यांनी करून घेतली नाही असे प्रभु अप्रतिष्ठ होत ॥ ९३ ॥ प्रतिष्ठित- प्रभु केवलज्ञानादि गुणांच्या स्थैर्याने स्थैर्ययुक्त झाले आहेत ॥ ९४ ।। सुस्थिर- योगांचा निरोध झाल्यावर उभे राहून किंवा पद्मासनाने प्रभु निश्चल झाले म्हणून सुस्थिर होत ॥ ९५ ।। स्थावर- विहाररहित असल्यामुळे प्रभु स्थावर होत ।। ९६ ।। स्थास्तु- अचल असल्यामुळे प्रभु स्थास्नु होत ॥ ९७ ।। प्रथीयान्अत्यन्त मोठे विशाल होण्याने प्रभु प्रथीयान् ।। ९८ ॥ प्रथित- जगत्प्रसिद्ध झाल्यामुळे प्रभूना प्रथित हे नाव आहे ॥ ९९ ।। पृथु- ज्ञानादि गणांनी महान् असल्यामुळे प्रभु पृथु आहेत ।। १०० ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org