Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५४)
महापुराण
(२५-१९८
तपनीयनिभस्तुङ्गो बालार्काभोऽनलप्रभः । सन्ध्याभ्रबभ्रुहेमाभस्तप्तचामीकरच्छविः ॥ १९८ निष्टप्तकनकच्छायः कनत्काञ्चनसन्निभः । हिरण्यवर्णः स्वर्णाभः शातकुम्भनिभप्रभः॥ १९९ युम्नाभो जातरूपाभो तप्तजाम्बूनवद्युतिः । सुधौतकलाधौतश्रीः प्रदीप्तो हाटकद्युतिः ॥ २००
शिष्टेष्टः पुष्टिदः पुष्ट: स्पष्टः स्पष्टाक्षरः क्षमः। शत्रुघ्नोऽप्रतिघोऽमोघः प्रशास्ता शासिता स्वभूः ॥ २०१
असल्यामुळे ते कनकप्रभ होत ।। ४८ ।। सुवर्णवर्ण- सोन्याप्रमाणे प्रभंचा वर्ण असल्यामुळे त्यांचे सुवर्णवर्ण हे नाव आहे ॥ ४९ ॥ रुक्माभ- रुक्म-सोने, त्याप्रमाणे त्यांची कान्ति असल्यामुळे प्रभु रुक्माभ आहेत ॥५०॥ सूर्यकोटिसमप्रभ- कोटिसूर्याप्रमाणे प्रभूची कान्ति असल्यामुळे ते सूर्यकोटिसमप्रभ आहेत ।। ५१॥ तपनीयनिभ- प्रभु तापविलेल्या सोन्याप्रमाणे आहेत ।। ५२ ।। तुङ्ग- उन्नत अर्थात् विशिष्ट फल देणारे प्रभु आहेत ।। ५३ ॥ बालार्काभ- बालसूर्याप्रमाणे प्रभूची प्रभा आहे म्हणून ते बालार्काभ आहेत ।। ५४ ॥ अनलप्रभ- अग्नीची कान्ति जशी असते तशी कान्ति असल्यामुळे प्रभु अनलप्रभ आहेत व त्यामुळे ते कर्मशत्रूचा नाश करणारे झाले ॥ ५५ ।। सन्ध्याभ्रबभ्रु- विप्रब्राह्मण उत्तम जे ध्यान करतात त्यास सन्ध्या हे नाव आहे. सर्व दिशा मिळवितो म्हणून, सर्व दिशा व्यापतो म्हणून मेघाला अभ्र म्हणतात. शोभा धारण करतो म्हणून बभ्रु-सन्ध्येच्या ढगाप्रमाणे पिंगट कान्तीचे प्रभु असल्यामुळे त्यांना सन्ध्याभ्रबभ्र हे नाव आहे ॥ ५६ ॥ हेमाभ- सोन्याप्रमाणे कान्तीचे धारक प्रभु हेमाभ आहेत ॥ ५७ ॥ तप्तचामीकरच्छवि- तापविलेल्या सोन्याप्रमाणे कान्ति ज्यांची आहे असे प्रभु तप्तचामीकरच्छवि होत ।। ५८ ॥
निष्टप्तकनकच्छाय- तापविलेल्या सोन्याप्रमाणे अङ्गशोभा ज्यांची आहे असे प्रभू ।। ५९ ॥ कनत्काञ्चनसंनिभ- चमकणान्या सुवर्णासारखे प्रभु आहेत ।। ६० ॥ हिरण्यवर्ण-- सोन्याप्रमाणे वर्ण ज्यांचा आहे असे प्रभु ॥ ६१ ॥ स्वर्णाभ-- सोन्यासारखी कान्ति धारण करणारे प्रभु ॥ ६२॥ शातकुम्भनिभप्रभ-- शतकुम्भ नामक पर्वतावर उत्पन्न झालेल्या सोन्याला शातकुम्भ म्हणतात. त्याप्रमाणे प्रभु शरीरकान्ति धारण करीत आहेत ।। ६३ ॥ द्युम्नाभसोन्याप्रमाणे आभा कान्ति ज्यांची असे भगवंत द्युम्नाभ होत ॥ ६४ ॥ जातरूपाभ-- जातरूपसोने त्याप्रमाणे आभा कान्ति असलेले प्रभु ॥ ६५ ।। तप्तजाम्बूनदद्युति- अग्नितप्त सोन्याप्रमाणे द्युति-कान्ति ज्यांची आहे असे प्रभु ॥ ६६ ॥ सुधौतकलधौतश्री- निर्मल अशा चान्दीप्रमाणे श्री-शोभेला धारण करणारे ॥ ६७ ॥ प्रदीप्त- अतिशय कान्तिसंपन्न ॥ ६८ ।। हाटकद्युति-- हाटक-सोने, त्याप्रमाणे कान्ति ज्यांची आहे असे प्रभु आहेत ।। ६९ ॥
शिष्टेष्ट-- इन्द्र, चक्रवर्ति, गणधरादि ज्या आदरणीय व्यक्ति त्यांच्याकडून प्रभु आदरिले गेले, पूजिले गेले आहेत ॥ ७० ॥ पुष्टिद-- प्रभु भक्तांचे पोषण करणारे आहेत म्हणून पुष्टिद आहेत ।। ७१ ॥ पुष्ट- पूर्वी सिद्ध झालेल्या महात्म्याप्रमाणे भगवान् अनन्त ज्ञानदर्शन सुखवीर्य आदिक गुणांनी पुष्ट-बलवान् झालेले आहेत ॥ ७२ ॥ स्पष्ट- प्रभूचे
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org