Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
महापुराण
दिग्वासादिशतकम् ।
दिग्वासा वातरशनो निर्ग्रन्थेशो दिगम्बरः । निष्किञ्चनो निराशंसो ज्ञानचक्षुरमोमुहः ॥ २०४ तेजोराशिरनन्तौजा ज्ञानाब्धिः शीलसागरः । तेजोमयोऽमितज्योतिर्ज्योतिर्मूतिस्तमोऽपहः ॥ २०५ जगच्चूडामणिर्दीप्तः शंवान्विघ्नविनायकः । कलिघ्नः कर्मशत्रुघ्नो लोकालोकप्रकाशकः ॥ २०६ अनिन्द्रालुरतन्द्रालुर्जागरूकः प्रमामयः । लक्ष्मीपतिर्जगज्ज्योतिर्धर्मराजः प्रजाहितः || २०७
५६)
( २५- २०४
दिग्वासा - दहा दिशा हेच वस्त्र ज्यांचे आहे असे प्रभु दिग्वासा होत अर्थात् पूर्ण नग्न होत ।। १ ।। वातरशन - वारा हाच ज्यांचा कडदोरा आहे असे भगवन्त वातरशन होत ॥ २ ॥ निर्ग्रन्थेश - घरदार वस्त्र आदि बाह्य दहा प्रकारचे परिग्रह व अन्तरङ्ग चौदा प्रकारचे परिग्रह या चोवीस परिग्रहांनी रहित अशा नग्न जैन साधूंचे भगवान् स्वामी आहेत || ३ || दिगम्बरपूर्वादिक दिशा हीच वस्त्रे प्रभूंनी धारण केली आहेत ॥ ४ ॥ निष्किञ्चन - ज्यांच्यापासून धन निघून गेले आहे असे अर्थात् सर्व परिग्रहत्यागी प्रभु निर्ग्रन्थाचार्य झाले ॥ ५ ॥ निराशंस - सर्व प्रकारच्या इच्छा ज्यांच्यापासून दूर गेल्या आहेत ते प्रभु निराशंस-आशारहित होत ॥ ६ ॥ ज्ञानचक्षु- मति, श्रुत, अवधि, मन:पर्यय व केवल ही पाच ज्ञाने चक्षु डोळा ज्याना आहे ते प्रभु ज्ञानचक्षु होत || ७ || अमोमुह - आदिभगवान् अत्यन्त मोहरहित झाल्यामुळे ते अमोमुह-पूर्ण निर्मोह झाले आहेत ।। ८ ।। तेजोराशि- पुष्कळ सूर्यसमूहाच्या तेजांच्या राशीप्रमाणे ज्याचा तेजःसमूह आहे असे प्रभु तेजोराशि आहेत ।। ९ ।। अनन्तौजा- अनन्त असे ओज- प्रकाश, बल, ज्यांच्या ठिकाणी आहे असे प्रभु आहेत ।। १० ।। ज्ञानाब्धि- प्रभु ज्ञानाचे - केवलज्ञानाचे सागर आहेत ।। ११ ।। शीलसागर -- अठरा हजार शीलांचे पालन प्रभु करीत असल्यामुळे ते त्यांचे समुद्र आहे || १२ || तेजोमय-- प्रभु तेजांनी पूर्ण आहेत ॥ १३ ॥ अमितज्योति-- प्रभु अमर्याद ज्योतिःस्वरूप आहेत ॥ १४ ॥ ज्योतिर्मूर्ति-- प्रभु जणु तेजाची मूर्ति आकृति धारण करून अवतरलेले आहेत ।। १५ ।। तमोऽपह-- तम-अन्धकाराचा अपहन्ति नाश करणारे आहेत. ।। १६ ।। जगच्चूडामणि- प्रभु आदिनाथ त्रैलोक्याला शोभविणारे जणु चुडामणि आहेत ॥ १७॥ दीप्त - ते कान्तिसम्पन्न आहेत || १८ || शंवान् -- शं सुख त्याने युक्त अर्थात् प्रभु अनन्तसुखयुक्त आहेत ।। १९ ।। विघ्नविनायक दान, लाभ, भोग, उपभोग आणि वीर्य-शक्ति यांची प्राप्ति न होऊ देणारे अशा अन्तराय कर्माला विघ्न म्हणतात. त्या विघ्नाचा विनायक-नाश करणारे प्रभु विघ्नविनायक होत ॥ २० ॥ कलिघ्न -- कलि-संग्राम-युद्ध त्याला घ्न- नष्ट करणारे प्रभु कलिघ्न होत ।। २१ ।। कर्मशत्रुघ्न- कर्मरूपी शत्रूला मारणारे प्रभु आहेत ॥ २२ ॥ लोकालोकप्रकाशक - भगवन्त लोक व अलोकाचे प्रकाशन करतात, व त्याचे वर्णन करून सांगतात ।। २३ ।। अनिद्रालु - प्रभु निद्रालु झोप न घेणारे सतत जागृत राहणारे आहेत ॥२४॥ अतन्द्रालु-- तन्द्रा आळस, तन्द्रालु म्हणजे आळशी - अतन्द्रालुः आळसाने रहित असे प्रभु तन्द्रालु होते ।। २५ ।। जागरूक - प्रभु आत्मस्वरूपात नेहमी जागे असतात म्हणून ते जागरूक आहेत ।। २६ ।। प्रमामय -- प्रभु प्रमामय -ज्ञानमय आहेत ॥ २७ ॥ लक्ष्मीपति-- प्रभु बाह्याभ्यन्तर लक्ष्मीचे पति आहेत ।। २८ || जगज्ज्योति- प्रभु सर्व जगाला ज्योतिरङग
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org