Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५२)
महापुराण
(२५-१९२
पुराणः पुरुषः पूर्वः कृतपूर्वाङ्गविस्तरः । आदिदेवः पुराणाद्यः पुरुदेवोऽधिदेवता ॥ १९२
अथ त्रिकालदर्यादिशतकम् । युगमुख्यो युगज्येष्ठो युगादिस्थितिदेशकः । कल्याणवर्णः कल्याणः कल्यः कल्याणलक्षणः ॥ १९३ कल्याणप्रकृतिर्दीप्तकल्याणात्मा विकल्मषः । विकलङ्कः कलातीतः कलिलघ्नः कलाधरः ॥ १९४
उल्लंघून सर्वश्रेष्ठता प्रभुंनी प्राप्त करून घेतली आहे म्हणून ते सर्वलोकातिग झाले. सर्व लोकांचे पुढारी बनले ॥ ५ ॥ पूज्य- सर्वांनी आराधण्यास योग्य असलेले ॥ ६ ॥ सर्वलोकैकसारथिप्रभु सर्वजगाचे नेते असल्यामुळे ते सर्व लोकात एक मुख्य-सारथी-नेता झाले आहेत ॥ ७ ॥ पुराण- परमौदारिक अशा आपल्या शरीरात प्रभु मोक्षाला जाईपर्यन्त राहतात म्हणून ते पुराण आहेत ॥ ८॥ पुरुष- सर्व जगताला आपल्या ध्यानाने व्यापून टाकणारे प्रभ परुष होत. अथवा पुरु- इन्द्रादिकांनी पूजनीय अशा पदात प्रभु राहतात म्हणून प्रभु पुरुष होत ॥ ९ ।। पूर्व- प्रभु अत्यन्त प्राचीन असल्यामुळे त्यांना पूर्व म्हणतात. म्हणजे ते सर्व जगात आद्य आहेत ॥ १० ॥ कृतपूर्वाङ्गविस्तर- भगवंतांनी पूर्वापासून अचलापर्यन्त एकोणतीस संख्यांचा विस्तार सांगितल्यामुळे ते कृतपूर्वाङगविस्तर या नावाला प्राप्त झाले अथवा प्रभुंनी उत्पादपूर्व, अग्रायणीपूर्व आदिक चौदा पूर्वांचा विस्तार रचला आहे म्हणून ते कृतपूर्वांङगविस्तर आहेत. अर्थात् प्रभुंनी सर्वशास्त्राचा विस्तार सांगितला आहे ॥ ११॥ आदिदेव- सर्व प्रण्यांना जे आदिकारण आहेत असे प्रभु आदिदेव होत अथवा जगत्सृष्टीच्या पूर्वीही प्रभु स्वतःच्या ज्ञानरूपतेजाने-नेत्राने दीप्तियुक्त तेजस्वी आहेत ॥ १२ ॥ पुराणाद्य- महापुराणाच्या आरम्भापूर्वी प्रभु जन्मले म्हणून ते पुराणाद्य होत ।। १३ ।। पुरुदेव- पुरु म्हणजे मोठे अर्थात् इन्द्रादिकांनाही पूज्य असे देवपद प्रभूना प्राप्त झाले आहे म्हणून ते पुरुदेव आहेत ॥ १४ ॥ अधिदेवताइन्द्रादिकाकडून अतिशय आदराने पूजले गेलेले प्रभु अधि-मुख्य श्रेष्ठ देव आहेत ॥ १५ ।।
युगमुख्य- कृतयुगांत आदिभगवान् मुख्य युगप्रधान झाले म्हणून ते युगमुख्य आहेत ॥ १६ ।। युगज्येष्ठ- कृतयुगामध्ये प्रभु ज्येष्ठ-वृद्ध व अतिशय प्रशंसनीय झाले आहेत ।। १७॥ युगादिस्थितिदेशक- कृतयुगाच्या प्रारम्भी आदिप्रभूनी क्षत्रिय, वैश्य व शूद्रांना जीवनाचे असि, मषि व कृष्यादि उपाय सांगितले म्हणून ते युगादिस्थितिदेशक होते ॥ १८ ॥ कल्याणवर्णकल्याणाप्रमाणे-सोन्याप्रमाणे प्रभूचे शरीर पीतवर्णाचे होते म्हणून त्यांना कल्याणवर्ण हे नाम आहे ॥ १९ ॥ कल्याण- कल्य-नीरोगीपणा, त्याने अनिति-भगवान् जगतात म्हणून ते कल्याण आहेत ॥ २० ॥ कल्य- कल्याण करण्यामध्ये कुशल असलेले श्रीजिन कल्य होत ॥ २१ ॥ कल्याणलक्षण- कल्याणमंगल हे चिह्न ज्यांचे आहे असे प्रभु कल्याणलक्षण आहेत ।। २२ ॥ कल्याणप्रकृति- कल्याण करणारी पुण्य प्रकृति ज्यांची आहे अर्थात् कल्याण करण्याचा स्वभाव ज्यांचा आहे असे भगवंत आदिजिन कल्याणप्रकृति होत ॥ २३ ॥ दीप्तकल्याणात्मा- दीप्तकल्याण देदीप्यमान असे पुण्य हा आत्मा ज्यांचा आहे असे प्रभु आहेत अर्थात् भगवन्त पुण्यात्मा आहेत ।। २४ ॥ विकल्मष- विगत नष्ट झालेले आहे कल्मष पाप ज्यांचे असे प्रभु विकल्मष
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org