Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५०)
महापुराण
( २५-१८७
अनीदृगुपमाभूतो दिष्टिर्देवमगोचरः । अमूर्तो मूर्तिमानेको नैको नानैकतस्त्वदृक् ॥ १८७ अध्यात्मगम्योऽगम्यात्मा योगविद्योगिवन्दितः । सर्वश्रगः सदाभावी त्रिकालविषयार्थदृक् ॥ १८८
मङ्ग म्हणजे सुख त्याला जे लाति म्हणजे देते त्याला मङ्गल म्हणावे. अर्थात् प्रभु आदिजिनेंद्र भक्तांना सुख देतात म्हणून मङ्गल आहेत. किंवा मम् पापं गालयति इति मङ्गलम् । मम् म्हणजे पाप त्याचा भगवन्त गालयति नाश करतात म्हणून ते मङ्गल आहेत. अथवा मङ्ग म्हणजे सुपुण्य ते भगवन्त भक्तांना देतात म्हणून त्याना मङ्गल म्हणावे ।। ६७ ।। मलहा - मल म्हणजे पाप ते आदिजिनेन्द्रांनी नाहीसे केले म्हणून त्यांना मलहा म्हणतात ॥ ६८ ।। अनय- अय म्हणजे शुभाशुभ दैव ज्याला कर्म असेही नाव आहे. ज्याला पाप-पुण्य असेही म्हणतात त्याने रहित आदिभगवन्त आहेत म्हणून त्यांना अनय म्हणतात ।। ६९ ।
एक- आदिजिनेश्वर एक
अनीदृक्- ईदृक्- हा पदार्थ याच्यासारखा दिसतो हा अर्थ ईदृक् शब्दाचा आहे. हे आदिप्रभु अमुकासारखे दिसतात. अशारीतीने आदिप्रभूंचे कोणाची तरी उपमा देऊन वर्णन करता येत नसल्यामुळे आदिप्रभु उपमारहित आहेत म्हणून ते अनीदृक् आहेत, उपमारहित आहेत ।। ७० ।। उपमाभूतो- हे प्रभो, आपण सर्व चांगल्या पदार्थांचे वर्णन करताना उपमाभूत आहात. अर्थात् इतराचे वर्णन करताना तो इतर पदार्थ प्रभूसारखा आहे असे म्हटले जाते ॥ ७१ ॥ दिष्टि - हे प्रभो, आपण शुभाशुभ फलाचे वर्णन करता म्हणून आपणास दिष्टि असे म्हणतात ।। ७२ ।। दैवम्- आपण निंदक आणि स्तुति करणारे अशा उभयांना क्रमाने देवअशुभ देव व शुभ दैव असे आहात ।। ७३ ।। अगोचर- गोचर इन्द्रियांचा विषय होणे. पण आपण अगोचर-इन्द्रियांचा विषय न होणारे असे आहात ।। ७४ ।। अमूर्त - स्पर्शरसादिक गुणांनी युक्त वस्तूला मूर्त म्हणतात. आपणामध्ये स्पर्श, रस, गन्धादिक नसल्यामुळे आपण अमूर्त आहात. अर्थात् इन्द्रियांनी न जाणलेले असे आहात ।। ७५ ।। मूर्तिमान् - म्हणजे आपण मूर्तीत स्थापले जाता म्हणून आपणास मूर्तिमान् म्हणतात ।। ७६ ।। आहेत म्हणजे त्यांना कोणाच्या साहाय्याची अपेक्षा नसते ।। ७७ ।। अर्थात् अनन्तशुद्धगुणधारक आहेत. अथवा न विद्यते रुद्रः के आत्मनि यस्य स नैकः- आदिप्रभूच्या आत्म्यांत रुद्र नहीं म्हणून ते नेक आहेत, अत्यन्त शान्त आहेत ।। ७८ ।। नानैकतत्त्वदृक्- भगवन्त आत्म्याला सोडून अनेक तत्त्वांना पाहत नाहीत. म्हणजे आत्मव्यतिरिक्त तत्त्वात पुद्गलादि तत्त्वात ते आसक्त होत नाहीत म्हणून ते नानैकतत्त्वदृक् आहेत ॥ ७९ ॥ अध्यात्मगम्यमिथ्यात्वादिक सर्व विकल्पसमूह सोडून शुद्ध आत्म्यात जे लीन होतात अशा महात्म्याकडून भगवान् जाणले जातात म्हणून भगवान् अध्यात्मगम्य आहेत ।। ८० ।। अगम्यात्मा- भगवंताचा आत्मा पापी लोकाकडून जाणला जात नाही, ते भगवंताचे स्वरूप जाणत नाहीत म्हणून प्रभु अगम्यात्मा आहेत ।। ८१ ।। योगवित् - जे प्राप्त झाले नाही ते प्राप्त होणे याला योग म्हणतात. त्याचे स्वरूप भगवान् जाणतात म्हणून भगवान् योगवित् आहेत ॥ ८२ ॥ योगिवन्दितध्यानाची सामग्री ज्यांना प्राप्त झाली आहे अशा महामुनिद्वारे भगवान् वन्दनीय आहेत, वन्दिले जातात म्हणून योगिवन्दित आहेत ॥ ८३ ॥ सर्वत्रग- भगवान् लोक व अलोकास व्यापतात
नैक - प्रभु एक नाहीत.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org