Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२५-१९१)
महापुराण
शङ्करः शंवदो दान्तो दमी क्षान्तिपरायणः । अधिपः परमानन्दः परात्मज्ञः परात्परः ॥ १८९ त्रिजगद्वल्लभोऽभ्यर्च्य स्त्रिजगन्मङ्गलोदयः । त्रिजगत्पतिपूज्याघ्रस्त्रिलोकाग्रशिखामणिः ॥ १९० त्रिकालदर्शी लोकेशो लोकधाता दृढव्रतः । सर्वलोकातिगः पूज्यः सर्वलोकैकसारथिः ॥ १९१
म्हणजे केवलज्ञानाने सर्व लोकालोकास जाणतात. यास्तव ते सर्वत्रग आहेत ॥ ८४ ॥ सदाभावी- सर्वं कालात प्रभु राहतात म्हणून सदाभावी आहेत ।। ८५ ।। त्रिकालविषयार्थदृक्भूतकाल, वर्तमानकाल व भविष्यकाल या तीनही कालातील संपूर्ण पदार्थांना त्यांच्या गुणपर्यायासह प्रभु पाहतात म्हणून ते त्रिकालविषयार्थदृक् आहेत ।। ८६ ।।
(५१
शङ्कर- शं-अनन्त आनन्दस्वरूप असे जे सुख ते उत्पन्न करणारे अशा आदिजिनेन्द्राला शंकर म्हणतात ।। ८ ।। शंवद - प्रभूंनी सर्व प्राण्यांना सुख कसे प्राप्त करून घ्यावे हे सांगितले म्हणून ते शंवद आहेत ॥ ८८ ॥ दान्त- तपश्चरणाचे क्लेश सहन करून प्रभूंनी इन्द्रिये ताब्यात ठेवली म्हणून ते दान्त आहेत ।। ८९ ।। दमी - इन्द्रियनिग्रह प्रभूंनी केला म्हणून ते दमी होत ।। ९० ।। क्षान्तिपरायण - क्षमाघारणात नेहमी तत्पर म्हणून प्रभु क्षान्तिपरायण आहेत ।। ९१ ॥ अधिप- सर्व जीवाचे अधिक रक्षण करतात म्हणून ते अधिप आहेत. अथवा त्रैलोक्याला व अलोकाकाशाला केवलज्ञानाने पितात म्हणजे व्यापतात म्हणून त्यांना अधिप म्हणावे ।। ९२ ।। परमानन्द - ज्यांना उत्कृष्ट आनन्द प्राप्त झाला आहे असे प्रभु परमानन्द या सार्थनामाचे धारक आहेत ।। ९३ ।। परात्मज्ञ - उत्कृष्ट केवलज्ञानाने युक्त जो आत्मा त्याला परात्मा म्हणतात अथवा परे - एकेन्द्रिय जीवापासून पंचेन्द्रिय जीवापर्यंत जे प्राणी आहेत ते निश्चयनयाने निजसमान - म्हणजे परमात्म्यासमान आहेत असे जाणणारे प्रभु परात्मज्ञ आहेत ।। ९४ ।। परात्पर - अन्य प्राण्यापेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे प्रभु परात्परः अथवा प्रभु सर्वकाली नेहमी राहणारे आहेत अथवा प्रभु श्रेष्ठापेक्षा श्रेष्ठ आहेत म्हणून ते परात्पर आहेत ।। ९५ ।। त्रिजगद्वल्लभ- त्रैलोक्यात असलेल्या सर्व प्राण्यांना प्रभु अतिशय आवडतात ।। ९६ ।। अभ्यर्च्य - प्रभु सर्व इन्द्रादिकांनी पूजेला योग्य आहेत ।। ९७ ।। त्रिजगन्मङ्गलोदय - त्रैलोक्यात असलेल्या सर्वं भव्यांना पंचकल्याणांची उदयप्राप्ति प्रभूपासून होते म्हणून प्रभु त्रिजगन्मङ्गलोदय आहेत ।। ९८ ।। त्रिजगत्पतिपूज्याघ्रि - त्रैलोक्याचे पति जे इन्द्र, धरणेन्द्र व चक्रवर्ती यांच्याकडून पूजण्यास योग्य आहेत चरण ज्यांचे असे प्रभु ।। ९९ ।। त्रिलोकाग्रशिखामणि- त्रैलोक्याच्या अग्रभागावर - मुक्तीच्या स्थानी प्रभु शिखामणीप्रमाणे शोभतात म्हणून ते त्रिलोकाग्रशिखामणि आहेत असे समजावे ।। १०० ।।
त्रिकालदर्शी - भूत, भविष्यत् व वर्तमानकालातील पदार्थांना पाहणारे भगवान् त्रिकालदर्शी होत ।। १ ।। लोकेश - त्रैलोक्यात असलेल्या सर्व प्राण्यांचे ईश स्वामी भगवान् लोकेश म्हटले जातात ।। २ ।। लोकधाता - जगातील सर्व प्राण्यांचे पालन करणारे प्रभु लोकधाता होत || ३ || दृढव्रत- भगवंताची दीक्षा व व्रतपालन दृढ असल्यामुळे ते दृढव्रत आहेत ।। ४ ।। सर्वलोकातिग- त्रैलोक्यातील सर्व प्राणिसमूहांना आपल्या श्रेष्ठ आचरणाने
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org