Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२५-१८६)
सुस्थितः स्वास्थ्यभाक् स्वस्थो नीरजस्को निरुद्धवः । अलेपो निष्कलङ्कात्मा वीतरागो गतस्पृहः ॥ १८५ वश्येन्द्रियो विमुक्तात्मा निःसपत्नो जितेन्द्रियः । प्रशान्तोऽनन्तधामर्षिर्मङ्गलं मलहानयः ॥ १८६
महापुराण
प्रभूंनी नाश केला म्हणून त्यांना कर्महा म्हणतात ॥ ४१ ॥ धर्मघोषण- अहिंसा सत्यादिक धर्मरूपी नगारा ज्यांचा आहे असे प्रभु धर्मघोषण म्हटले जातात ।। ४२ ।। अमोघवाक्- अमोघ - सफल वाक्-वाणी ज्यांची असे प्रभु अमोघवाक् आहेत ।। ४३ ।। अमोघाज्ञ - सफल आज्ञा ज्यांची असे प्रभु अमोघाज्ञ आहेत ॥ ४४ ॥ निर्मम - ममताभाव भगवंतापासून निघून गेल्यामुळे भगवान् निर्मम आहेत ।। ४५ ।। अमोघशासन - ज्यांचा उपदेश, ज्यांचे कथन अमोघ -सफल आहे ते प्रभु अमोघशासन होत ।। ४६ ।। सुरूप- ज्यांचे रूप-सौन्दर्य उत्तम आहे असे प्रभु सुरूप होत ।। ४७ ।। सुभग- सु-उत्तम भग-ज्ञान, महात्म्य आणि सौन्दर्य ज्यांचे आहे असे प्रभु सुभग होत ॥। ४८ ।। त्यागी - त्याग म्हणजे दान ते आहारदान, अभयदान व ज्ञानदान असे तीन प्रकारचे आहे असा त्याग असे दान ज्यांचे आहे असे ते प्रभु त्यागी होत ।। ४९ ।। समयज्ञसमय-काल व सिद्धान्त जे जाणतात ते प्रभु समयज्ञ होत ।। ५० ।। समाहित- समाधानाला प्राप्त झालेले प्रभु समाहित होत. अथवा मनाची एकाग्रता ठेवणारे प्रभु समाहित होत ॥ ५१ ॥
Jain Education International
(४९
सुस्थित- उत्तम रीतीने क्लेशरहित होऊन राहिलेले भगवान् सुस्थित आहेत. अर्थात् सुखी आहेत ।। ५२ ।। स्वास्थ्यभाक् - मनाला स्वतःमध्ये स्थिर करणे ते स्वास्थ्य होय. त्या स्वास्थ्याचा आश्रय केलेले भगवान् स्वास्थ्यभाक् आहेत ।। ५३ । स्वस्थ - प्रभु नेहमी आत्मस्वरूपात राहतात म्हणून ते स्वस्थ आहेत ।। ५४ ।। नीरजस्क- ज्ञानावरण व दर्शनावरण या दोन कर्माना रज म्हणतात. ही दोन कर्मे ज्यांची नष्ट झाली आहेत असे प्रभु नीरजस्क आहेत ।। ५५ ।। निरुद्धव- उद्धव-यज्ञ. त्या यज्ञापासून प्रभु वेगळे झाले आहेत म्हणून ते निरुद्धव. प्राणियज्ञापासून सर्वथा वेगळे असे प्रभु आहेत ।। ५६ ।। अलेप- पापकर्म मलाच्या लेपाने रहित असे प्रभु ।। ५७ ।। निष्कलङ्कात्मा - अपवाद म्हणजे कलङ्क त्या कलंकापासून प्रभूंचा आत्मा वेगळा झाल्यामुळे प्रभु निष्कलङ्कात्मा आहेत ।। ५८ ।। वीतराग- ज्यांचा रागभाव नष्ट झाला आहे असे प्रभु वीतराग होत ।। ५९ ।। गतस्पृह- स्पृहा इच्छा ती प्रभूंची नष्ट झाली म्हणून ते गतस्पृह झाले, निरिच्छ झाले ।। ६० ।। वश्येन्द्रिय- स्पर्शनादिक पाच इन्द्रिये प्रभूंच्या स्वाधीन असल्यामुळे ते वश्येन्द्रिय आहेत ।। ६१ ।। विमुक्तात्मा- प्रभूंचा आत्मा संसारातून सुटला आहे म्हणून ते विमुक्तात्मा आहेत ।। ६२ ।। निःसपत्न- ज्यांचा शत्रु-मोहादिक कर्मशत्रु नष्ट झाला आहे असे ते भगवान् निःसपत्न होत ॥ ६३ ॥ जितेन्द्रिय- प्रभूंनी स्पर्शरसादिक विषयापासून आपल्या इन्द्रियांना स्पर्शन, जीभ, नाक, डोळे आणि कान यांना पराङ्मुख केले म्हणून ते जितेन्द्रिय झाले आहेत त्यांना जितेन्द्रिय म्हणावे ॥ ६४ ॥ प्रशान्त - प्रभु प्रशान्त रागद्वेषमोहरहित झाले म्हणून ते प्रशान्त होत अथवा प्र म्हणजे अतिशय श-सुख व ते अन्ते म्हणजे जवळ ज्यांच्या आहे असे प्रभु प्रशान्त होत । ६५ ।। अनन्तधामर्षि - अनन्तधाम म्हणजे केवलज्ञान. त्याने युक्त असे ऋषि जे प्रभु त्यांना अनन्तधामर्षि म्हणतात ।। ६६ ।। मंगलं -
म. ७
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org