Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२५-१८०)
महापुराण
सुघोषः सुमुखः सौम्यः सुखदः सुहितः सुहृत् । सुगुप्तो गुप्तिभृद्गोप्ता लोकाध्यक्षो वमीश्वरः ॥१७८ बृहन्वहस्पतिर्वाग्मी वाचस्पतिरुदारधीः । मनीषी धिषणो धीमान् शेमुषीशो गिरांपतिः ॥ १७९ नेकरूपो नयोत्तुङ्गो नैकात्मा नकधर्मकृत् । अविशेयोऽप्रतर्यात्मा कृतज्ञः कृतलक्षणः ॥ १८०
सुघोष- सु-अतिशय स्पष्ट असा घोष-योजनपर्यंत पसरणारा दिव्यध्वनि ज्यांचा आहे असे प्रभु सुघोष होत ।। ९१ ॥ सुमुख- उत्तम शोभणारे-वीतरागतायुक्त मख ज्यांचे आहे असे ।। ९२ ॥ सौम्य- करतारहित मुख ज्यांचे आहे असे प्रभु सौम्य होत ।। ९३ ॥ सुखदआसक्तीच्या अभावी मनात जो संतोष उत्पन्न होतो त्याला सुख म्हणतात. असे सुख प्रभपासून भक्तांना मिळते म्हणून ते सुखद आहेत ॥ ९४ ।। सुहित- ज्यांच्या ठिकाणचा पुण्योदय उत्तम हित करणारा आहे. अर्थात् निदानरहित पुण्य आत्महितच करणारे असते. प्रभु निनिदानाने पुण्ययुक्तच असतात ॥ ९५ ॥ सुहृत्- ज्यांचे मन शोभन -निर्मल आहे असे ।। ९६ ॥ सुगुप्त- ज्यांचे स्वरूप गुप्त आहे, गूढ आहे. मिथ्यात्वीजनाना न समजणारे असे ते प्रभु सुगुप्त होत ।। ९७ ॥ गुप्तिभृत्- मन, वचन व शरीराच्या शुभाशुभ प्रवृत्तीचा निग्रह करणे ती गुप्ति होय. रत्नत्रयाचे रक्षण करणे ही गुप्ति होय. रत्नत्रयाचे जी रक्षण करते, पालन करते ती गुप्ति होय. या गुप्तीला प्रभूनी धारण केले आहे म्हणून प्रभु गुप्तिभृत् आहेत ।। ९८ ।। गोप्ता- आत्म्याचे जे रक्षण करतात. त्याचा अधःपात होऊ देत नाहीत असे जिनदेव गोप्ता होत ॥ ९९ ॥ लोकाध्यक्ष- लोकांना-प्रजांना अध्यक्षः प्रत्यक्ष झालेले अथवा त्रैलोक्याला प्रत्यक्ष पाहणारे प्रभु लोकाध्यक्ष आहेत ॥१००।। दमेश्वर- दम तपश्चरणाचे दुःख सहन करणे तो दम होय. प्रभु त्या दमाचे ईश्वर स्वामी आहेत म्हणून त्यांना दमेश्वर म्हणतात ॥ १०१॥
८ बृहवाविशतम् बृहबृहस्पति- भगवंत हे सर्व देवामध्ये मोठे अर्थात् वृद्ध बृहस्पति आहेत ॥१॥ वाग्मीभगवंताची वाणी अतिशय प्रशस्त आहे. त्यामुळे ते उत्तम वाग्मी वक्ते आहेत ॥२॥ वाचस्पति- दिव्यध्वनीचे स्वामी आहेत ॥ ३ ॥ उदारधी- त्याग व विक्रम या गुणानी सहित भगवंताची बुद्धि असल्यामुळे ते उदारबुद्धियुक्त आहेत ॥ ४॥ मनीषी- मननात्मक बुद्धीचे धारक ।। ५ ।। धिषण- भगवंत प्रगल्भ बुद्धीचे धारक आहेत म्हणून त्यांना धिषण म्हणतात ।।६।। धीमान्- प्रभु बुद्धिमान् आहेत ॥७॥ शेमुषीश- शे म्हणजे मोह त्याला मुष लुटणारी जी बुद्धि तिचे प्रभु ईश स्वामी आहेत ।। ८ । गिरांपति- प्रभु वाणीचे-द्वादशांग सरस्वतीचे पति-प्रभु आहेत ॥ ९॥ नैकरूप- अनेक रूपे धारण करीत असल्यामुळे प्रभूना नैकरूप म्हणतात ॥ १०॥ नयोत्तुङ्ग- नेगमसङग्रहादि सात नय किंवा स्यादस्ति, स्यान्नास्ति इत्यादि सात भंग याच्या द्वारे भगवान् वस्तुस्वरूप सांगत असल्यामुळे ते अतिशय उंच आहेत ।। ११ ।। नैकात्मा- भगवान् अशरीर- पुनः शरीर धारण करीत नाहीत व ते असंख्यात जीवप्रदेशानी युक्त आहेत ।। १२॥ नकधर्मकृत्- यतिधर्म व साधुधर्म असे द्विविध धर्म सांगितले म्हणून त्यांनी अनेक धर्माचे कथन केले आहे ।। १३ ।। अविज्ञेय- भगवंताचे स्वरूप आम्ही जाणणे अशक्य आहे म्हणून ते अविज्ञेय आहेत ।। १४ ॥ अप्रतात्मा- भगवंताचे स्वरूपाचा तर्क आम्हाला करता
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org