Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४८)
महापुराण
ज्ञानगर्भो दयागर्भो रत्नगर्भः प्रभास्वरः । पद्मगर्भो जगद्गर्भो हेमगर्भः सुदर्शनः ।। १८१ लक्ष्मीवांस्त्रिदशाध्यक्षो द्रढीयानिन ईशिता । मनोहरो मनोज्ञाङ्गो धीरो गम्भीरशासनः ॥ १८२ धर्मयूपो दयायागो धर्मने मिर्मुनीश्वरः । धर्मचक्रायुधो देवः कर्महा धर्मघोषणः ॥ १८३ अमोघवागमोघाज्ञो निर्ममोऽमोघशासनः । सुरूपः सुभगस्त्यागी समयज्ञः समाहितः ॥ १८४
येत नाही असे ते आहेत ।। १५ ।। कृतज्ञ - कृतयुगाचे स्वरूप भगवंतानी जाणले आहे म्हणून कृतज्ञ आहेत ।। १६ ।। कृतलक्षण- भगवान् श्रीवृक्ष, शंख, कमल, स्वस्तिक, अङकुश, तोरण आदिक लक्षणानी युक्त आहेत म्हणून त्यांना कृतलक्षण म्हणतात ॥ १७ ॥
( २५-१८१
ज्ञानगर्भ- मातेच्या उदरात गर्भात भगवंत मति, श्रुत आणि अवधि या तीन ज्ञानानी सहित होते म्हणून ते ज्ञानगर्भ आहेत ।। १८ ।। दयागर्भ- जीवावर दया करणे हा गुण प्रभु मातेच्या गर्भात असताना त्यांच्या ठिकाणी आहे म्हणून ते दयागर्भ ।। १९ ।। रत्नगर्भमातेच्या गर्भात असताना मातेच्या अंगणात रत्नवृष्टि होत होती म्हणून प्रभु रत्नगर्भ होते ||२०|| प्रभास्वर - प्रभूंचे शरीर अतिशय तेजस्वी होते म्हणून ते प्रभास्वर ।। २१ ।। पद्मगर्भ- मातेच्या गर्भात असतानाच प्रभु लक्ष्मीसम्पन्न होते ॥ २२ ॥ जगद्गर्भ- त्रैलोक्य प्रभूंच्या गर्भात असल्यामुळे ते जगद्गर्भ होत. त्रैलोक्याचे ज्ञान मातृगर्भात असतानाही प्रभूंना होते ॥ २३ ॥ हेमगर्भ- मातेच्या उदरात असताना सुवर्णवृष्टि होत असल्यामुळे प्रभु हेमगर्भ होते ॥ २४ ॥ सुदर्शन - प्रभूंचे दर्शन सुखाने, अनायासाने होते म्हणून ते सुदर्शन होत ।। २५ ।। लक्ष्मीवान्अनन्तज्ञानादि स्वरूपी लक्ष्मी प्रभुजवळ आहे म्हणून ते लक्ष्मीवान् ।। २६ ।। त्रिदशाध्यक्षत्रिदशांना देवांना अध्यक्ष- प्रत्यक्ष होणारे प्रभु ॥ २७ ॥ द्रढीयान्- प्रभु अतिशय दृढ असतात ।। २८ ।। इन - ध्यानाच्या सामर्थ्याने योगी आपल्या हृदयकमलामध्ये प्रभूला आणतात म्हणून प्रभु इन होत ।। २९ ।। ईशिता - ईष्टे - ऐश्वर्यवान् प्रभु झाले म्हणून ते ईशिता आहेत ॥ ३० ॥ मनोहर - भव्यांच्या मनाला हरण करतात म्हणून प्रभु मनोहर ॥ ३१ ॥ मनोज्ञांग- मनोज्ञसुंदर अंग - शरीर ज्यांचे असे प्रभु मनोज्ञाङ्ग आहेत ॥ ३२ ॥ धीर - आपल्या ध्येयाकडे बुद्धीला प्रेरणारे प्रभु धीर होत. अथवा भव्यांना बुद्धि देणारे म्हणून प्रभु धीर आहेत ।। ३३ ।। गम्भीरशासन - ज्यांचे मत गंभीर अगाध आहे. अर्थात् ज्यांचे मताच्या तळाला आम्ही स्पर्श करू शकत नाही असे प्रभु गंभीरशासन होत ॥ ३४ ॥
धर्मयूप- धर्माचा दयेचा स्तम्भः प्रभु जणु दयेचा यज्ञस्तम्भ आहेत ।। ३५ ।। दयायागसगुण असोत अथवा निर्गुण असोत सर्व प्राणिमात्रावर दया करणे हेच पूजन ज्यांचे आहे असे प्रभु दयायाग होत ॥ ३६ ॥ धर्मनेमि - धर्मरथाच्या चक्राला प्रभु नेमि धावेप्रमाणे आहेत ||३७|| मुनीश्वर - जे प्रत्यक्ष ज्ञानी आहेत अशा मुनींचे भगवान् ईश्वर-प्रभु-स्वामी आहेत ॥ ३८ ॥ धर्मचक्रायुध - धर्म हाच पापशत्रूचा नाश करणारे चक्र आहे. अर्थात् धर्मचक्र हे आयुध ज्यांचे आहे असे प्रभु धर्मचक्रायुध होत ।। ३९ ।। देव - दीव्यति क्रीडति परमानन्दपदे इति देवः प्रभु नेहमी परमानन्दपदात क्रीडा करतात म्हणून ते देव होत ॥ ४० ॥ कर्महा - शुभाशुभ कर्माचा
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org