Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२५-१७४)
महापुराण
(४५
सुमेधा विक्रमी स्वामी दुराधर्षो निरुत्सुकः । विशिष्टः शिष्टभुक् शिष्टः प्रत्ययः कामनोऽनघः॥१७२ क्षेमी क्षेमरोऽक्षय्यः क्षेमधर्मपतिः क्षमी । अग्राह्यो ज्ञाननिग्राह्यो ध्यानगम्यो निरुत्तरः ॥ १७३ सुकृती धातुरिज्याहः सुनयश्चतुराननः । श्रीनिवासश्चतुर्वक्त्रश्चतुरास्यश्चतुर्मुखः ॥ १७४
सुमेधा- ज्यांची सुमेधा-सुबुद्धि आत्मस्वरूपात तत्पर असते असे प्रभु ॥ ३७॥ विक्रमी-प्रभ सर्वापेक्षा अतिशय तेजस्वी व कर्मनाश करण्यात अतिशय शूर असे आहेत ॥ ३८॥ स्वामी- सु-अतिशय निर्दोषपद्धतीने अमति प्रभु वस्तुस्वरूपाकडे आत्मस्वरूपाकडे जातात म्हणजे जाणतात म्हणून ते स्वामी आहेत किंवा स्व-आत्मा तो ज्यांनी प्राप्त करून घेतला आहे त्याचे यथार्थ स्वरूप जाणले आहे असे ।। ३९ ॥ दुराधर्ष- ज्यांचा केव्हाही अपमान तिरस्कार करणे शक्य नाही असे प्रभु दुराधर्ष आहेत ।। ४० ॥ निरुत्सुक- उत्कण्ठारहित, रागद्वेष रहित ॥४१॥ विशिष्ट- प्रभु विशिष्ट-उत्तम आहेत ।। ४२ ।। . शिष्टभुक्- शिष्ट-साधु-मुनि यांचे भुक् प्रभु पालन-रक्षण करतात म्हणून ते शिष्टभुक् आहेत किंवा शिष्टभुत् साधूंना सज्जनांना प्रभु जाणतात म्हणून ते शिष्टभुत् आहेत ॥४३॥ शिष्ट- सदाचारसंपन्न ॥ ४४ ।। प्रत्यय- प्रभु प्रत्यय- आत्मज्ञानी आहेत व इतराना आत्म्याची ओळख करून देतात ॥ ४५ ॥ कामन- प्रभु अत्यंत सुंदर आहेत ॥ ४६ ।। अनघ- प्रभु पापरहित आहेत ॥ ४७ ॥
क्षेमी-क्षेम- मोक्ष तो ज्यांना प्राप्त झाला आहे असे प्रभु क्षेमी होत ॥ ४८ ॥ क्षेमकर- प्रभु भव्यांचे कल्याण करतात म्हणून ते क्षेमकर ।। ४९ ।। अक्षय्य- ज्यांचा कधीही नाश होत नाही असे ।। ५०॥ क्षेमधर्मपति- जीवांचे मंगल-कल्याण करणारा असा जो धर्म त्याचे पति स्वामी प्रभु आहेत ॥ ५१॥ क्षमी- प्रभु अन्तरायकर्माच्या नाशामुळे क्षम-अनन्त शक्ति संपन्न झाले म्हणून क्षमी ।। ५२॥ अग्राह्य- जे परस्त्रीलम्पट आहेत, कुलजाति गर्वोद्धत आहेत, मधमांस, मद्यसेवनात आसक्त आहेत असे लोक भगवंताला मानीत नाहीत म्हणून प्रभु त्यांच्याद्वारे अग्राह्य आहेत ।। ५३ ॥ ज्ञाननिग्राह्य- ज्ञानाने-केवलज्ञानाने निश्चयाने प्रभूचे स्वरूप जाणले जाते म्हणून ते ज्ञाननिग्राह्य आहेत ॥ ५४ ॥ ध्यानगम्य- ध्यानाने चित्ताच्या एकाग्रतेने प्रभु गम्य जाणले जातात म्हणून ते ध्यानगम्य आहेत ॥ ५५ ॥ निरुत्तर- प्रभु अतिशय उत्कृष्ट आहेत म्हणून त्याना निरुत्तर म्हणतात अथवा संसारसागरातून तरून जातात म्हणन प्रभ निरुत्तर आहेत ॥५६॥ सुकृती- ज्यापासून शुभ फल प्राप्त होते असे कार्य ते सुकृत होय. अर्थात् पुण्याला सुकृत म्हणतात ते प्रभुजवळ आहे म्हणून ते सुकृती ।। ५७ ।। धातु- प्रभु शब्दाचे उत्पादक आहेत म्हणून ते धातु आहेत ।। ५८ ।। इज्याह- प्रभु आमच्याकडून पूजण्यास योग्य आहेत म्हणून ते इज्याह आहेत ।। ५९ ।। सुनय- वस्तूच्या एक एक धर्माचे वर्णन करणारे व अन्यधर्माचा निषेध न करता त्याला गौण करणारे असे जे वस्तूच्या एका अंशाचे ज्ञान त्यास सुनय म्हणतात व असे नय प्रभुंनी सांगितले आहेत म्हणून प्रभु सुनय होत ।। ६० ।। चतुरानन- समवसरणात भक्तांना प्रभु चारमुखाचे दिसतात म्हणून ते चतुरानन होत ॥ ६१ ।। श्रीनिवास- सर्व श्रींचे शोभांचे-सौन्दर्यांचे प्रभु निवास-वसतिस्थान आहेत म्हणून ते श्रीनिवास ॥ ६२॥ चतुर्वक्त्र- ॥ ६३ ॥ चतुरास्य- ॥ ६४ ॥ चतुर्मुख- चार घातिकर्माचा नाश
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org