Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२५-१६८)
महापुराण
आनन्दो नन्दनो नन्दो वन्द्योऽनिन्द्योऽभिनन्दनः । कामहा कामदः काम्यः कामधेनुररिञ्जयः॥१६७ असंस्कृतत्सुसंस्कारोऽप्राकृतो वैकृतान्तकृत् । अन्तकृत्कान्तगुः कान्तश्चिन्तामणिरभीष्टदः ॥१६८
प्रणतेश्वर- नम्र अशा भव्यजीवांचे स्वामी असल्यामुळे त्यांना प्रणतेश्वर म्हणतात ॥ ८३ ॥ प्रमाणं- केवलज्ञानरूपी प्रमाणाने प्रभु युक्त आहेत ॥ ८४ ।। प्रणिधि- योगी प्रभूना आपल्या हृदयात गुप्त ठेवतात म्हणून त्यांना प्रणिधि म्हणतात ।। ८५ ।। दक्ष-प्रभु समर्थ व कौशल्ययुक्त असल्यामुळे दक्ष आहेत ॥ ८६ ॥ दक्षिण- सरलस्वभावी असल्यामुळे प्रभु दक्षिण आहेत ।।८७॥ अध्वर्यु- ज्ञानरूपयज्ञ करणाऱ्या प्रभूना अध्वर्यु म्हणतात ॥ ८८ ॥ अध्वर- निर्दोष मार्गाने जाणारे प्रभु अध्वर या नावाने शोभतात ।। ८९ ॥ आनन्द- प्रभु सर्वबाजूनी आनंदयुक्त आहेत ।।९०।। नन्दन- भक्तांच्या सुखादिकांची प्रभु वृद्धि करतात म्हणून ते नन्दन आहेत ।।९१॥ नन्द- नं ज्ञानं ददातीति नन्दः प्रभु भक्ताना आत्महिताचे ज्ञानदान देतात म्हणून ते नन्द होत ॥९२।। वन्द्य-प्रभु देवेन्द्रादिकाकडून वन्द्य व स्तुत्य आहेत ।। ९३ ।। अनिन्द्य- प्रभु भूक, तहान वगैरे अठरा दोषांनी रहित असल्यामुळे ते निन्द्य नाहीत अर्थात् ते प्रशंसनीय आहेत ॥ ९४ ॥ अभिनन्दन-प्रभु आपल्या सौंदर्यादिगुणांनी प्रजाना आनंदित करतात. अथवा प्रभूच्या सभेत भयरहित अशी अशोकवन, सप्तपर्णवनादि चार वने आहेत म्हणून ते अभिनंदन आहेत ।। ९५॥ कामहा- प्रभुंनी कन्दर्पाचा - मदनाचा नाश केला म्हणून ते कामहा आहेत ॥ ९६ ।। . कामद- भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात म्हणून ते कामद आहेत ॥ ९७ ॥ काम्य- अत्यन्त मनोहर किंवा सर्वांना आवडणारे असे प्रभु काम्य होत ।। ९८॥ कामधेनु- भक्तांच्या इच्छा नेहमी पूर्ण करीत असल्यामुळे प्रभु कामधेनु आहेत ॥ ९९ ।। अरिजय- अठ्ठावीस भेदांच्या मोहशत्रूना प्रभूनी जिंकले म्हणून ते अरिञ्जय आहेत ॥ १०० ।।
. ७ अथ असंस्कृताविशतम् ।
असंस्कृतसुसंस्कार- स्वाभाविक संस्कारयुक्त असे प्रभु अथवा ज्यांना अपूर्व लाभ झाला आहे असे ।। १॥ अप्राकृत- असंस्कृत असूनही प्राकृत नसलेले असे. जिनेश्वर वयाच्या आठवे वर्षी आपण होऊन मूलगुणांना धारण करतात ।। २॥ वैकृतान्तकृत्- विकृतीपासून उत्पन्न झालेल्या रोगांचा प्रभूनी नाश केला आहे ।। ३ ।। अन्तकृत्- भगवंतानी संसाराचा नाश केला आहे म्हणून ते अन्तकृत् आहेत. अथवा अन्त-मरणाचा अन्त-नाश प्रभुंनी केला आहे किंवा अन्त म्हणजे मोक्षाचा समीपपणा त्यांनी केला आहे. अथवा अन्त म्हणजे आत्म्याच्या शुद्धस्वरूपाला त्यांनी प्राप्त करून घेतले आहे. अथवा व्यवहाराचा अन्त करून निश्चयाचा स्वीकार केला आहे असे प्रभु. अथवा मुक्तीच्या अन्ती एके बाजूला प्रभु राहतात ॥ ४ ॥ कान्तगु- कान्ता सुन्दर-गुः वाणी ज्यांची आहे असे प्रभु ॥ ५॥ कान्त- शोभायुक्त असे कान्त आहेत ।। ६॥ चिन्तामणि- चिन्तामणिप्रमाणे इच्छित फल देणारे प्रभु ॥ ७ ॥ अभीष्टदमनाने इच्छिलेले देणारे असे प्रभु ॥ ८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org