Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४२)
महापुराण
सर्वयोगीश्वरोऽचिन्त्यः श्रुतात्मा विष्टरश्रवाः । दान्तात्मा दमतीर्थेशी योगात्मा ज्ञानसर्वगः ॥ १६४ प्रधानमात्मा प्रकृतिः परमः परमोदयः । प्रक्षीणबन्धः कामारिः क्षेमकृत्क्षेमशासनः ॥ १६५ प्रणवः प्रणयः प्राणः प्राणदः प्रणतेश्वरः । प्रमाणं प्रणिधिर्वक्षो दक्षिणोऽध्वर्युरध्वरः ॥ १६६
( २५- १६४
सर्वयोगीश्वर - जिनदेव सर्वगणधरादिक योग्यांचे ईश्वर स्वामी आहेत ॥ ६२॥ अचिन्त्य - आमच्या मनाला विषय न होणारे प्रभु अचिन्त्य आहेत ॥ ६३ ॥ श्रुतात्मा श्रुत म्हणजे द्वादशाङ्गाचे ज्ञान तेच आत्मा ज्यांचा आहे असे प्रभु श्रुतात्मा होत. अर्थात् प्रभु ज्ञानमय आहेत ।। ६४ ।। विष्टरश्रवा - विष्टर आसनाप्रमाणे श्रवा कान असल्यामुळे प्रभु विष्टरश्रवा आहेत. अथवा विष्टरावरून म्हणजे सिंहासनावरून स्रवति धर्मामृत धर्मामृताचा प्रवाह चालू करणारे अर्थात् सिंहासनावर बसून धर्मोपदेश प्रभु देतात म्हणून विष्टरश्रवा हे त्यांचे नाव आहे ।। ६५ ।। दान्तात्मा - तपश्चरणाचे क्लेश सहन करणारा आत्मा ज्यांचा आहे असे प्रभु दान्तात्मा होत. अथवा द-अभयदान देणे हा ज्यांचा अन्तःस्वभाव अन्तःकरणाचा स्वभाव आहे असे प्रभु दान्तात्मा आहेत ।। ६६ ।। दमतीर्थेश - दमतीर्थ इंद्रियाच्या निग्रहाचे वर्णन करणाऱ्या शास्त्राला दमतीर्थ म्हणतात त्याचे ईश-प्रभु स्वामी आहेत ॥ ६७ ॥ योगात्मा - योग पूर्वी न प्राप्त झालेले केवलज्ञानादिक गुण प्राप्त होणे त्याला योग म्हणतात. त्याने प्रभूचा आत्मा युक्त झात्यामुळे ते योगात्मा झाले ॥ ६८ ॥ ज्ञानसवंग- केवलज्ञानाने सर्व लोकालोकाला प्रभु जाणतात म्हणून ते सर्वलोकग आहेत ॥ ६९ ॥ प्रधान- एकाग्रतेने आत्मा आपल्या स्वरूपात प्रभूंनी स्थिर केला आहे म्हणून प्रभु प्रधान आहेत. उत्कृष्ट शुक्लध्यानाला प्रधान म्हणतात व त्या ध्यानाच्या संबंधाने भगवंत देखील प्रधान आहेत ॥ ७० ॥ आत्मा - अतति सततं गच्छति लोकालोकस्वरूपं जानातीति आत्मा जो सतत जातो म्हणजे लोकालोकाचे स्वरूप जाणतो त्यास आत्मा म्हणतात. भगवान् नेहमी लोकालोक स्वरूप जाणतात म्हणून त्यांना आत्मा म्हणतात ।। ७१ ।। प्रकृति - प्रकृष्टा - उत्कृष्ट अर्थात् त्रैलोक्याचे हित करणारी जी कृति-तीर्थप्रवर्तन ते भगवंत करतात म्हणून भगवंताना प्रकृति म्हटले आहे. अथवा तीर्थंकरप्रकृतीने युक्त असलेल्या भगवंतानाही प्रकृति म्हटले आहे. अथवा प्रकृति म्हणजे स्वभाव. धर्मोपदेश देण्याचा जो स्वभाव त्याने युक्त असल्यामुळे भगवंतानाही प्रकृति म्हटले आहे ।। ७२ ।। परमः परा- उत्कृष्ट मा-लक्ष्मी ज्यांची आहे ते प्रभु परम होत ॥ ७३ ॥ परमोदय- परम उत्कृष्ट उदय-अभ्युदय ज्यांचा आहे असे प्रभु परमोदय होत ॥ ७४ ॥ प्रक्षीणबंध - ज्यांचा कर्मबन्ध अत्यन्त क्षीण झाला आहे असे प्रभु प्रक्षीणबन्ध होत ॥ ७५ ॥ कामारि - सर्व इन्द्रियांना प्रीति आह्लाद उत्पन्न करणारा जो काम-मदन त्याचे भगवान् शत्रु आहेत म्हणून त्यांना कामारि म्हणतात ।। ७६ ।। क्षेमकृत् - भव्यजनांचे मंगल करणारे भगवान् क्षेमकृत् आहेत ॥७७॥ क्षेमशासन- भगवंताचा शासन-उपदेश हा क्षेम करणारा आहे ।। ७८ ।। प्रणव- भगवान् ॐकारस्वरूपी आहेत व हा ॐकार उत्कृष्ट स्तुतिस्वरूप आहे. प्रत्येक धर्मकार्याच्या प्रारंभी ॐ काराचे स्मरण करावे ।। ७९ ।। प्रणय- भगवान् सर्वावर प्रेम करतात म्हणून ते प्रणयरूप आहेत ॥ ८० ॥ प्राण- जगाला जिवंत ठेवणारे असल्यामुळे प्रभु प्राण आहेत ।। ८१ ।। प्राणद- सर्वजीवांचे रक्षण करणारे प्रभु प्राणद आहेत ॥। ८२ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org