________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान १६. Preveaweekeeeeeeeeeeeeeeeeeeers है दुसरा एखादा दुष्टपणा करणाऱ्या श्रोत्यापेक्षां न समजले तरी उगीच स्वस्थ बसून वक्त्याने सांगितलेले ६ ऐकणारा श्रोता बरा, हे स्पष्ट आहे. ह्मणून पाषाणासारखे जे श्रोते त्यांचीही गणना मध्यम श्रोत्यांतच ? केली आहे. छिद्रपडलेल्या घागरीसारखे श्रोते मणण्याचे तात्पर्य असे आहे की, छिद्र पडलेल्या घागरीतील पाणी जसे निघून जाते त्याप्रमाणे वक्त्याने सांगितलेले शास्त्र ज्यांच्याजवळ फार वेळ टिकत नाही तसले ४ श्रोते. ह्या तीन प्रकारच्या श्रोत्यामध्येही स्वाभाविक असे काही दोष असल्याने ह्यांची मध्यमश्रोत्यांत गणना केली आहे. ह्याप्रमाणे उत्तम आणि मध्यम अशा दोन प्रकारच्या श्रोत्यांची लक्षणे सांगितली. ह्याहून ९बाकी राहिलेले जे श्रोते ते कनिष्ठप्रतीचे श्रोते होत, असे समजावें. ह्यांत सर्प, रेडा, चाळण, डांस, मांजर, कंगवा (केस विंचरण्याची फणी) आणि जळवा ह्या सातांचा समावेश होतो. हे सात पदार्थ स्वभावतः दुष्ट असल्याने ह्यांच्यासारखें जे श्रोते ते कनिष्ठ प्रतीचे श्रोते समजावेत. ह्याचे विवेचन असें सर्प हा दूध पितो, परंतु त्याचे विष करतो, त्याप्रमाणे चांगले ऐकून त्याचा वाईट परिणाम करणारा जो श्रोता तो नीच
श्रोता होय. रेडा हा आपल्याला पोषण करणाऱ्यास देखील मारावयास धांवतो, त्याप्रमाणे वक्त्याचा मूर्खट्रपणाने अपमान करणारा श्रोता नीच होय. चाळण ही पीठ टाकून खडे वर आणिते, त्याप्रमाणे ग्राद्यांश! टाकून त्याज्यांशाचा स्वीकार करणारा श्रोता नीच होय. कंगवा हा केस विंचरतांना त्यांतील कसपटें बाहेर है
काढतो, त्याप्रमाणे वक्त्याचे गुण टाकून दोष तेवढे उकरून काढणारा श्रोता नीच समजावा. डांस Farsunucumcurcumau munununununununuararaan
For Private And Personal Use Only