________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान १५, generwearnesentencorreckewnerdonwacecacrorernet
आहे. ह्याचे तात्पर्य असे आहे की, गाय गरीव असल्यामुळे, ती दुष्टपणा न करता त्या मानाने दुसऱ्याचा १ उपयोग करते. हंसाचा, पाणी आणि दूध ही निरनिराळी करण्याचा गुण स्वाभाविक असल्याचे सर्वांस ? माहीत आहे. मृत्तिकेचा, पाणी आपल्यांत जिरविण्याचा गुण स्वाभाविक आहे. आणि राघूचा शिक-४ विलेले तेवढे ध्यानात ठेवण्याचा गुणही स्वाभाविक आहे. ह्मणून ह्या चारी वस्तूंत वास्तविक पाहिले ९ असतां स्वाभाविक गुणच सांपडतात. ह्याच्या उलट जर ह्या वस्तूंत दोष दृष्टी पडत असले, तर ते स्वाभा९विक नमून, औपाधिक आहेत हे स्पष्ट आहे. तेव्हां ज्या श्रोत्यांमध्ये अशाप्रकारचे (स्वाभाविक ) गुणच Sअसतात, दोष असत नाहीत, त्या श्रोत्यांची गणना उत्तम श्रोत्यांत केली हे योग्य आहे. शेळी, शिला आणि छिद्र पडलेली घागर ह्यांच्यासारखे जे श्रोते असतात, ते मध्यम श्रोते समजावेत, ह्याचे विवेचन असे की, ज्याप्रमाणे मागें गायीपासून दुसऱ्याचा उपयोग होत असल्याचे सांगितले आहे, त्याप्रमाणे ह्या ठिकाणीही समजावयाचे आहे. फरक इतकाच की, गाईपासून अधिक उपयोग होतो आणि शेळीपासून दुसऱ्याचा थोडासा उपयोग होतो. ह्मणून शेळीसारखे दुसऱ्याचा थोडासा उपयोग करणारे जे श्रोते असतात ते मध्यमश्रोते होत. तसेंच शिलेप्रमाणे असणारे श्रोतेही मध्यम समजावेत. ह्यांत शिलेप्रमाणे असणारे श्रोते ह्मणजे आपल्याला न समजले तरी, कोणत्याही प्रकारचा दुष्टपणा न करता स्वस्थपणे : बसून ऐकणारे श्रोते असा अर्थ घ्यावयाचा आहे. तेव्हां समजून किंवा न समजून उगीच वितंडवाद किंवा
00000000000000000Uoooooots
EIAS
For Private And Personal Use Only