________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय पहिला. पान १४. Indoreeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeedoes
श्रोत्यांत उत्तम, मध्यम आणि नीच असे तीन प्रकार आहेत. ह्मणजे त्यांतील कित्येक उत्तम आहेत, कित्येक मध्यम आहेत आणि कितिएक नीच आहेत. गोहंसमृच्छुकाजाहिमहिषाश्चालिनी शिला ॥ कङ्कच्छिद्रघटौ दंशमार्जारसजलौकसः ॥ २४ ॥
अर्थ- गाय , हंस, मृत्तिका, राघु, शेळी, सर्प, रेडा, चाळण, पाषाण, कंगवा (फणी) छिद्र असलेली घागर , डांस , मांजर आणि जळवा हे श्रोत्याचे चवदा प्रकार होत. गोहंसमृच्छुकाः श्रेष्ठामध्याश्चाजाशिलाघटाः॥शेषा नीचाः परिप्रोक्ता धर्मशास्त्रविवर्जिताः ॥२५॥
अर्थ- त्या चवदांपैकी गाय, हंस, मृत्तिका आणि राघु ह्यांच्यासारखे जे श्रोते असतात, ते उत्तम इसमजावेत. कारण, गाईसारखे जे श्रोते असतात त्यांनी ऐकलेल्याचा दुसऱ्यास चांगला उपयोग होतो. हंसासारखे जे असतात ते चांगल्यावाइटांची निवड करतात. मृत्तिकेसारखे जे श्रोते असतात ते- मृत्तिका जशी पाणी आपल्यांत ग्रहण करते ( जिरविते ) त्याप्रमाणे-ऐकलेले तितकें सर्व आपल्या बुद्धीने ग्रहण करणारे असतात. आणि राघूमारखे जे श्रोते असतात, ते एकच गोष्ट पुष्कवेळां ऐकावयास मिळाली 9 असतां चांगली लक्षात ठेवतात. ह्मणून हे चार प्रकारचेही श्रोते उत्तमांतच गणले आहेत. अशा प्रकारच्या श्रोत्यांची गणना उत्तम श्रोत्यांत करण्याचे दुसरेही एक कारण असे आहे की, गाय, हंस, मृत्तिका आणि शुक ( राघू ) ह्या वस्तूंत स्वतःचे दोष नसतात. उदाहरणार्थ गाय ही गरीब स्वभावासंबंधाने सर्वत्र प्रसिद्ध 0000000wwsa
araavaa0wwwse
PROBOBA000
For Private And Personal Use Only