________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsur Gyanmandir
VISUAvisor
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ११. Pecaeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeem
छन्दोविरुद्धं यदलक्षणं वा । काव्यं भवेच्चेन्निबिडं प्रमादात् ॥
तदेव दूरीकुरुतात्र भव्यं । साध्वेव हि स्वीकुरुतात्र सन्तः॥१८॥ अर्थ- ह्या ग्रंथांत जर एखादी कविता दुर्लक्षामुळे छंदःशास्त्रांतील नियमांस सोडून झाली असेल, किंवा एखादी कविता जर चाललेल्या विषयाला अगदीच सोडून भलत्याच विषयाबद्दल झाली असेल, तर सज्जनांनी ती तेवढी काढून टाकून, ज्या कविता चांगल्या असतील त्याच घ्याव्यात!
परिहर्तव्यो दुर्जन इह लोके भूषितोऽपि गुणजालैः॥
मणिना भूषितमूर्धा फणी न किं भयङ्करो नृणाम् ॥ १९॥ अर्थ---- दुष्ट मनुष्य अनेक गुणांनी युक्त जरी असला तथापि ह्या जगांत सर्वांनी त्याचा त्याग करावा, ह्मणजे त्याचा कोणीही सहवास करूं नये. कारण, सर्पाच्या मस्तकावर जरी रत्न असतें तथापि तो, ज्याप्रमाणे लोकांना भीतीच उत्पन्न करीत असतो, त्याप्रमाणे दुष्ट मनुष्य केव्हाही त्रासच देणार आहे.
वक्त्याचे लक्षण. सर्वेषां दर्शनानां मनसि परिगतज्ञानवेत्ता भवेद्धि ।
वक्ता शास्त्रस्य धीमान्विमलशिवसुखार्थी सुतत्त्वावभासी ।।
निर्लोभः शुद्धवाग्मी सकलजनहितं चिन्तकः क्रोधमुक्तो॥ unavaunarunnurunumunawwarunumunaunannyrun
For Private And Personal Use Only