________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय पहिला, पान ९.
PU
"ह्मणजे माझ्यामध्ये गुण आहेत असे तो मुद्दामच मानणार नाही.
कविर्वेत्ति काव्यश्रमं सत्कवेहि । स्फुटं नाकविः काव्यकर्तृत्वहीनः॥
यथा बालकोत्पत्तिपीडां प्रसूतौ । न वन्ध्या विजानाति जानाति सूता ॥१४॥ अर्थ- ज्याप्रमाणे गर्भातून मूल बाहेर येतांना किति क्लेश होतात, हे जी स्त्री प्रसूत झाली असेल तिलाच कळतें, वंध्येला कळत नाहीं; त्याप्रमाणे, चांगल्या कवीला काव्य करण्याला किति क्लेश भोगावे लागतात हे जो कवि असेल त्यालाच कळतें. ज्याला कविता करता येत नाही त्याला मुळींच कळत नाही. ह्मणून दुर्जनांनी आह्मांला दोष दिल्यास त्यांत आश्चर्य नाही.
गुणेषु दोषेपु न यस्य चातुरी । निन्दा स्तुतिर्वा न हि तेन कीर्त्यते ॥
जात्यन्धकस्येव हि धृष्टकस्य वै । रूपेऽत्र हासाय परं विचारणा ॥१५॥ ___ अर्थ-गुण कोणते व दोष कोणते, हे समजण्याचे चातुर्य ज्याच्यामध्ये नाही, तो जर त्यासंबंधाने काही बोलला, तर त्याने निंदा केली असेंही होत नाही, व स्तुति केली असेंही होत नाही. तर, ज्याप्रमाणे जन्मांधानें रूपाच्या बऱ्यावाईटपणाबद्दल विचार करणे हास्यास्पद होते, त्याप्रमाणे त्या मूर्खाचे गुणदोषांविषयींचे विचार हास्यास्पद होतात. काव्यं सूते कविरिह कली तद्गुणं सन्त एव । तन्वन्त्याराद्गुणगणतया खं गुणं ख्यापयन्तः॥ 2
For Private And Personal Use Only