________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान १०. १eeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee
अम्भः सूते कमलवनकं सौरभं वायुरेव । देशं देशं गमयति यथा द्रव्यजोऽयं स्वभावः ॥१६॥ है अर्थ- ज्याप्रमाणे पाणी कमलवनाला उत्पन्न करते आणि वायु कमलांचा सुगंध निरनिराळ्या ?
प्रदेशांत नेतो, त्याप्रमाणे ह्या कलियुगांत अशी स्थिति आहे की, कवि काव्य करतो, आणि सज्जन हे ६ हत्या कवीच्या सद्गुणांची प्रसिद्धि करितात. ह्यामुळे त्या सज्जनांचेही सद्गुण व्यक्त होतात. आता : ६ सज्जनांनी दुसऱ्याच्या गुणाची प्रसिद्धि का करावी? असे जर कोणी विचारील, तर, त्याला एवढेच उत्तर सांगता येईल की, कमलांचा सुगंध चोहीकडे पसरणे हा जसा त्या द्रव्याचा (वायूचा ) स्वभाव आहे , त्याप्रमाणे तो सजनांचा स्वभाव आहे. दुसरे काही नाही.
शुश्रूषये भव्यजना वदन्ते । जिनेश्वरैरुक्तमुपाश्रिताय ॥ __ शब्दास्ताः सकलाः पुराणा । निन्दा न कार्या कविभिस्तु तेषाम् ॥१७॥ अर्थ- श्रीजिनेद्रांनी आपल्या जवळ वास करणाऱ्या गणधरमुनीला में धर्मस्वरूप सांगितले, तेंच पुढे भक्तिमान् अशा श्रावकांना आचार्यांनी सांगितले आहे. ह्यात श्रीजिनेंद्रांनी ज्या अर्थाकरिता ज्या शब्दांचा) प्रयोग केला त्याच अर्थाकरितां आचार्यही त्याच शब्दाचा प्रयोग करू लागले. असे असल्यामुळे प्रस्तुतच्या धर्मकथनांतील शब्द व अर्थ प्राचीन संकेताने ठरल्याप्रमाणे जसेच्या तसेच ठेविले आहेत. ह्मणून आधुनिक विद्वानांनी 'अमक्या अर्थाकरितां अमक्या शब्दाची योजना केली आहे ही चूक आहे' अशी निंदा करूं नये.! Karavanannnnnnnnnnnnnnnnnnnnnn
BABUS
For Private And Personal Use Only