Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२५- १५८)
महाव्रतपतिर्मह्यो महाकान्तिधरोऽधिपः । महामैत्रीमयोऽमेयो महोपायो महोमयः ।। १५७ महाकारुणिको मन्ता महामन्त्री महायतिः । महानादो महाघोषो महेज्यो महसां पतिः ॥ १५८
महापुराण
महेश्वर- फार मोठ्या योग्यतेचे जे गणधर, इन्द्रादिक त्यांचे प्रभु ईश्वर स्वामी आहेत म्हणून ते महेश्वर आहेत ॥। १०० ।।
Jain Education International
( ३९
महामुनि - प्रभु महामुनि अर्थात् प्रत्यक्षज्ञानी आहेत ॥ १ ॥ महाध्यानी- धर्मध्यान व शुक्लध्यान या दोन ध्यानांना महाध्यान म्हणतात. त्या दोन ध्यानानीच त्यानी केवलज्ञान प्राप्त केले आहे म्हणून ते महाध्यानी आहेत ॥ २ ॥ महामोनी - भगवान् आदि जिनेश्वर महामोन धारक होते. त्यांनी एक हजार वर्षेपर्यन्त मौनानेच छद्मस्थावस्थेत विहार केला. इतकी वर्षे कोणी मौन धारण केले नव्हते || ३ || महादम- प्रभु मोठे तपः क्लेश सहिष्णु होते म्हणून ते महादमधारक होत. किंवा प्रभु महादान देण्यात लक्ष्मीचा त्यानी व्यय केला म्हणून महादमी होते ।। ४ ।। महाक्षम- प्रभूच्या ठिकाणी इतरात आढळून न येणारी अपूर्व क्षमा होती म्हणून ते महाक्षमावान् होते ।। ५ ।। महाशील - अहिंसादि पाच व्रतांचे रक्षण करण्यास उपाय असलेल्या अठरा हजार शीलांचे प्रभु पालक होते म्हणून ते महाशीलवान् साधु होते ।। ६ ।। महायज्ञ - ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय आणि अन्तराय या चार घातिकर्मरूपी समिधांचे ज्यात हवन केले जात आहे असा मोठा ज्ञानयज्ञ ज्यांचा आहे असे प्रभु महायज्ञकारी होत. अथवा ज्यांचे पूजन इन्द्रध रणेन्द्रादिकांनी केले असल्यामुळे व चन्दनादिक अनेक सामग्रीनी युक्त असल्यामुळे फार मोठे आहे असे प्रभु महायज्ञ नामाने शोभतात. अथवा केवलज्ञानरूपी महायज्ञ ज्यांचा आहे असे ।। ७ ।। महामख - पूज्य आहे मख - महायज्ञ ज्यांचा असे प्रभु महामख नावाने शोभतात ॥ ८ ॥ महाव्रतपति- अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य, सर्वपरिग्रहांचा त्याग-नग्नता आणि रात्रि भोजन वर्जन या महाव्रतांचे पालक प्रभु महाव्रतपति होत ॥। ९ ॥ मह्य - महाव्रताचे पालक असल्यामुळे प्रभु मह्य-पूज्य आहेत ॥ १० ॥ महाकान्तिधरइतरात--इन्द्रादिकात न आढळणारी कान्ति शोभा प्रभूमध्ये आहे म्हणून ते महाकान्तिधर आहेत ।। ११ ।। अधिप- अधिकं पाति- सर्व जीवांचे अधिक रक्षण प्रभु करतात म्हणून ते अधिप आहेत अथवा अधिकं पिबति-लोकालोकं केवलज्ञानेन व्याप्नोति- लोक व अलोकाला ते पितात म्हणजे केवलज्ञानाने लोकालोकांना जाणतात ।। १२ ।। महामैत्रीमय - जगातील सर्व जीवांचे जीवन सुखमय असो अशा बुद्धीने प्रभु पूर्ण भरलेले आहेत म्हणून ते महामंत्रीमय होत ||१३|| अमेय - कोणत्याही परिमाणाने प्रभु आम्हा कडून मोजले जात नाहीत म्हणून ते अमेय आहेत ||१४|| महोपाय - सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान, सम्यक्चारित्र व तप हे मोक्षप्राप्तीचे महान् उपाय आहेत असे प्रभूंनी सांगितले म्हणून ते महोपाय आहेत ।। १५ ।। महोमय - मह - उत्सवाचे प्रभु मय बंधु आहेत. अथवा महसा ज्ञानेन निर्वृत्तः - ज्ञानाने पूर्ण प्रभु झाले म्हणून ते महोमय
आहेत ।। १६ ।।
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org