Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३८)
महापुराण
(२५-१५४
महामहा, महाकोतिर्महाकान्तिर्महावपुः । महादानो महाज्ञानो महायोगो महागुणः ॥ १५४ महामहपतिः प्राप्तमहाकल्याणपञ्चकः । महाप्रभुमहाप्रातिहार्याधीशो महेश्वरः ॥ १५५ महामुनिमहाध्यानी महामौनी महादमः । महाक्षमो महाशीलो महायज्ञो महामखः ॥ १५६
मोठी संपदा- समवसरणादिसंपत्ति ज्यांना प्राप्त झाली आहे असे ते प्रभु महासम्पदेने युक्त आहेत ।। ७४ ॥ महाबल- सर्व पदार्थांना जाणणारे केवलज्ञानरूपी बल प्रभूना प्राप्त झाले आहे. अथवा फार मोठे शरीरसामर्थ्य व निर्भयपणा यांनी युक्त प्रभु महाबलयुक्त आहेत ।।७५।। महाशक्ति- ज्यांच्या ठिकाणी फार मोठा उत्साह आहे असे प्रभु महाशक्तियुक्त होत ।। ७६ ।। महाज्योति- महा-मोठा ज्योतिः केवलज्ञानरूपी डोळा ज्यांना आहे असे प्रभु महाज्योति होत ॥ ७७ ।। महाभूति- मोठी भूति-सम्पत्ति ज्यांना प्राप्त झाली आहे असे प्रभु महाभूतियुक्त होत ॥७८ ॥ महाद्युति- मोठी कांति-शोभा ज्यांच्या ठिकाणी आहे असे प्रभु महाद्युतीचे धारक होत ।। ७९ ॥
महामति- मोठी बद्धि ज्यांची आहे असे प्रभु ।। ८० ॥ महानीति- महान्यायाचे पालन करणारे व त्याचे वर्णन करणारे ॥ ८१ ॥ महाक्षान्ति- फार मोठी क्षमा धारण करणारे ॥८२।। महादय- ज्यांच्या ठिकाणी प्राणिरक्षण करणारी मोठी दया आहे असे ॥८३॥ महाप्राज्ञ-मोठी प्रज्ञा-बुद्धिविशेष ज्यांच्या ठिकाणी आहे असे प्रभु महान् विवेकशील आहेत ॥८४॥ महाभाग- ज्यांना राजे मोठा करभाग देत असत असे अथवा ज्यांची महापूजा करून भक्त सेवा करतात असे ।। ८५ ॥ महानन्द- मोठा आनन्द-अनन्तसुख ज्यांना प्राप्त झाले आहे असे. अथवा महेन- ज्यांच्या चरणांची पूजा करण्याने भव्यांना आनंद प्राप्त होतो म्हणून प्रभु महानन्द आहेत ।। ८६ ॥ महाकवि- प्रभु सर्वश्रेष्ठ कवि आहेत म्हणून ते महाकवि होत ॥ ८७ ॥ महामहा- महा-मोठे महा-सतेज ज्यांचे आहे असे प्रभु महामहा होत ।। ८८ ॥ महाकोतिज्यांची मोठी कीर्ति आहे असे प्रभु महाकीर्तियुक्त होत ॥ ८९ ॥ महाकान्ति- ज्यांच्या शरीरात फार मोठी कान्ति शोभा आहे असे प्रभु ।। ९० ॥ महावपु- ज्यांचे शरीर महा-फार प्रशस्त आकृतीचे आहे असे प्रभु ॥ ९१ ।। महादान- ज्यांचे दान मोठे आहे अथवा ज्यांचे प्राणिरक्षण फार मोठे आहे ॥ ९२ ।। महाज्ञान- ज्यांचे ज्ञान-केवलज्ञान जगाला जाणणारे असल्यामुळे फार मोठे आहे ॥ ९३ ।। महायोग- ज्यांचा योग चित्ताला स्वस्वरूपात स्थिर करणारा फार मोठा आहे असे ॥ ९४ ॥ महागुण- फार मोठे अनन्तज्ञान, दर्शन, सुखशक्ति आदिक गुण ज्यांचे ठिकाणी आहेत असे प्रभु महागुणयुक्त आहेत ॥ ९५ ॥ महामहपतिफार मोठ्या पूजेचे-मेरुपर्वतावरील इन्द्रकृत महाभिषेकाचे प्रभु स्वामी आहेत ।। ९६ ॥ प्राप्तमहाकल्याणपञ्चक- गर्भावतार, जन्माभिषेक, दीक्षा घेणे, केवलज्ञानप्राप्ति व मोक्ष या पाच महाकल्याणांची प्राप्ति झाली. त्यामुळे प्राप्तमहाकल्याणपञ्चक या नांवाचे प्रभु धारक झाले ।। ९७ ॥ महाप्रभु- आदिजिनेश्वर हे महाप्रभु महास्वामी आहेत ॥ ९८॥ महाप्रातिहार्याधीश- महाऐश्वर्यरूप अशोकवृक्षादिक आठ पदार्थांचे प्रभु स्वामी आहेत ॥ ९९ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org