Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३६)
महापुराण
(२५-१४८
अतीन्द्रोऽतीन्द्रियोधीन्द्रो महेन्द्रोऽतीन्द्रियार्थदृक् । अनिन्द्रियोऽहमिन्द्रार्यो महेन्द्रमहितो महान् ॥ उद्भवः कारणं कर्ता पारगो भवतारकः । अगायो गहनं गुह्यं पराद्धः परमेश्वरः ॥ १४९ अनन्तद्धिरमेद्धिरचियद्धिः समग्रधीः । प्राग्यः प्राग्रहरोऽभ्यनः प्रत्यग्रोऽग्योऽग्रिमोऽग्रजः ॥ १५०
त्या जन्मापर्यन्त नि अतिशयेन धनं लक्ष्मीर्यस्य स अनादिनिधनः । नि म्हणजे अतिशय लक्ष्मी ज्यांच्याजवळ राहिली असे जिनेश्वर हे अनादिनिधन आहेत. भगवम्त समवसरणात राहून देखिल नवनिधिरूपलक्ष्मीने त्यांना सोडले नाही म्हणून ते अनादिनिधन आहेत ॥ २६ ।। व्यक्त- त्यांचे स्वरूप प्रकट आहे. अथवा ते अर्थाना-जीवादिकपदार्थांना व्यक्त करतात. म्हणून व्यक्त आहेत ।। २७ ।। व्यक्तवाक्- सर्व प्राण्यांना समजेल अशी स्पष्ट भाषा प्रभूची असते. ते स्पष्टार्थवादी असतात ।। २८ ।। व्यक्तशासन- व्यक्त-निर्मल-विरोधरहित प्रभूचे शासन-मत आहे ।। २९ ॥ युगादिकृत्- कृतयुगाचा प्रारंभ आदिभगवंतांनी केला म्हणून ते युगादिकृत् आहेत. आषाढकृष्णप्रतिपदेच्या दिवशी आदिभगवंतांनी कृतयुगाचा आरंभ केला व ते सर्व प्रजांचे स्वामी झाले ।। ३० ॥ युगाधार- भगवान् कृतयुगाचे मूलाधार आहेत ।। ३१ ।। युगादि- भगवान् कृतयुगाच्या आरंभी झाले म्हणून ते युगादि आहेत ।। ३२ ॥ जगदादिजजगातील प्राण्यांच्या आधी प्रभु जन्मले म्हणून ते जगदादिज आहेत ॥ ३३ ॥
अतीन्द्र- हे प्रभो, आपण आपल्या अतिशय प्रभावाने इन्द्राला उल्लंघिले असल्यामुळे त्याचे स्वामी झालेले आहात ॥ ३४ ।। अतीन्द्रिय- आपण इन्द्रियांना ओलांडले आहे. अर्थात् इन्द्रियज्ञानाने रहित आहात, केवलज्ञानी आहात ॥ ३५ ॥ धीन्द्र- धिया- केवलज्ञानाने आपण इन्द्र- परमात्मा झालेले आहात ।। ३६ ॥ महेन्द्र- आपण महान् इन्द्र आहात ।। ३७ ।। अतीन्द्रियार्थदृक्- आपण अतीन्द्रियार्थज्ञानाने-केवलज्ञानाने सर्व चराचरांना पाहता, जाणता ।। ३८ ॥ अनिन्द्रिय- आपणास स्पर्शनादिक पाच इन्द्रिये नाहीत. अर्थात् भावेन्द्रिये नाहीत. पण नामकर्माने उत्पन्न झालेल्या आकृतिरूप द्रव्येन्द्रियांनी युक्त आपण आहात ॥ ३९ ॥ अहमिन्द्राज़- नवग्रैवेयक, नवानुदिश आणि पंचानुत्तर येथील अहमिन्द्राकडून आपण पूजनीय झालेले आहात ॥ ४० ॥ महेन्द्रमहित- बत्तीस इन्द्रांनी आपण पूजिले आहात. भवनवासि दहा इन्द्र, व्यन्तरांचे आठ इन्द्र, ज्योतिरिन्द्र, चन्द्र व सूर्य हे दोन व स्वर्गीय बारा इन्द्र अशा बत्तीस इन्द्रांनी आपण पूजिले जाता ।। ४१ ।। महान्- महतीति महान्- अर्थात् आपण महान् सर्वपूज्य आहात ॥ ४२ ॥
उद्भव- उत्प्रधान-मुख्य श्रेष्ठ भव:जन्म- प्रभुंचा जन्म सर्वश्रेष्ठ आहे किंवा उत्उद्गतः भवः संसारः यस्य- ज्यांचा भवसंसार नष्ट झाला आहे असे ।। ४३ ।। कारणं- आपण मोक्षप्राप्तीला कारण आहात म्हणून आपणास कारण म्हणतात ।। ४४ ।। कर्ता- शुद्धभावांचे शुद्धोपयोगाचे आपण कर्ते आहात ।। ४५ ।। पारग- संसाराच्या पाराला अन्ताला आपण पोहोचलेले आहात ॥ ४६ ॥ भवतारक- पाच प्रकारच्या संसारापासून आपण भव्यांना तारता म्हणून भवतारक आहात ॥ ४७ ।। अगाह्यो- भगवंताच्या पार जाणे आम्हाला शक्य नाही
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org