Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३४)
महापुराण
(२५-१४३
कविः पुराणपुरुषो, वर्षीयान् ऋषभः पुरुः । प्रतिष्ठाप्रभवो हेतुर्भुवनैकपितामहः ॥ १४३ श्रीवृक्षलक्षणः श्लक्ष्णो लक्षण्यः शुभलक्षणः । निरक्षः पुण्डरीकाक्षः पुष्कलः पुष्करेक्षणः ॥१४४
रक्षण करता म्हणून त्राता ॥ ८७ ।। भिषग्वर- आपण वैद्यात श्रेष्ठ आहात. जन्मापासून रोगपीडित प्राण्यांनी आपले नामस्मरण केले तरीही त्यांच्या रोगांचा नाश करता. कुष्ठी रोग्यांचे शरीर सोन्याप्रमाणे करता. जन्मजरामरणांना मुळापासून उपटून टाकता. म्हणून आपण श्रेष्ठ वैद्य आहात ।। ८८ ।। वर्य- मक्तिलक्ष्मीने आपण वरण्यास योग्य आहात. अथवा सेवेसाठी आलेल्या देवेन्द्रादिकाकडून आपण आदराने वेढले जाता. अथवा आपण मुख्य असल्यामुळे आपणास वर्य म्हणतात ॥ ८९ ॥ वरद- अभीष्ट अशा स्वर्गमोक्षाला आपण देता म्हणून वरद आहात ।। ९० ॥ परम- भक्तांच्या मनाला आवडणारे पदार्थ आपण देता, धनादिक आपण देता म्हणून परम आहात ।। ९१ ॥ पुमान्
पले अनसरण करणाऱ्या त्रैलोक्यात असलेल्या भक्तजनसमूहाला आपण पवित्र करता म्हणून पुमान् आहात ।। ९२ ।।
कवि-धर्माधर्माचे स्वरूप आपण सांगता म्हणून कवि आहात ।। ९३ ।। पुराणपुरुषअतिशय प्राचीन असे आपण पुरुष आत्मा आहात ॥ ९४ ॥ वर्षीयान्- आपण प्राचीन असल्यामुळे अतिशय वृद्ध आहात ।। ९५ ।। ऋषभ- ऋषति जगज्जानातीति भातिच आपण सर्व जगाला जाणता व त्यामुळे शोभता म्हणून ऋषभ आहात ।। ९६ ॥ पुरु- आपण सर्वांचे पालन करता म्हणून आपण पुरु-मोठे महान् आहा ।। ९७ ।। प्रतिष्ठाप्रभव- आपल्याठिकाणी स्थैर्याची उत्पत्ति झाली आहे. अर्थात् आपले शुद्धस्वरूप नेहमीच स्थिर राहणारे आहे ॥ ९८ ।। हेतुहि गतौ हिनोति जानातीति हेतु - आपण सर्व जगाला जाणता म्हणून हेतु आहात ॥ ९ ॥ भुवनैकपितामह- आपण त्रैलोक्यातील सर्व भव्यलोकांचे पितामह-आजोबा आहा ॥ १०० ॥
श्रीवृक्षलक्षण- अशोकवृक्ष हे प्रभूचे लक्षण आहे. कारण समवसरणात अशोकवृक्षाच्या खाली जिनदेव विराजमान झालेले असतात व त्यांना दूरूनच पाहून भव्यलोक प्रभूना ओळखतात म्हणून भगवंतांना श्रीवृक्षलक्षण म्हणतात ॥ १॥ श्लक्ष्ण- अनन्तज्ञानादि-लक्ष्मीने आलिंगिलेले प्रभु श्लक्ष्ण या नांवाने शोभतात ।। २॥ लक्षण्य- आठ महाव्याकरणात प्रभु कुशल असतात. म्हणून ते लक्षण्य आहेत ।। ३ ।। शुभलक्षण- भगवंतांच्या हातावर व पायावर श्रीवृक्ष, शंख, कमळ, स्वस्तिक वगैरे १०८ शुभ लक्षणे असतात. म्हणून शुभलक्षण हे त्यांना अन्वर्थक नांव आहे ।। ४ ॥ निरक्ष- ज्यांना इन्द्रियापासून ज्ञान होत नाही असे अर्थात् आत्म्यात प्रकट झालेल्या केवलज्ञानाने प्रभु सर्व चराचरांना जाणतात ॥ ५॥ पुण्डरीकाक्षपुण्डरीक- कमलाप्रमाणे डोळे ज्यांचे आहेत असे प्रभु पुण्डरीकाक्ष होत ॥ ६ ॥ पुष्कल- प्रभु गुणांनी पूर्ण व श्रेष्ठ असल्यामुळे त्यांचे पुष्कल हे नांव आहे ॥ ७॥ पुष्करेक्षण- पुष्करकमलाप्रमाणे ईक्षण डोळे ज्यांचे आहेत असे प्रभु पुष्करेक्षण होत ॥ ८ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org