Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२५-१४७)
महापुराण
(३५
सिद्धिदः सिद्धसङ्कल्पः सिद्धात्मा सिद्धसाधनः । बुद्धबोध्यो महाबोधिर्वर्धमानो महद्धिकः ॥१४५ वेदाङ्गो वेदविद्वंद्यो जातरूपो विदांवरः । वेदवेद्यः स्वसंवेद्यो विवेदो वदतांवरः॥ १४६ अनादिनिधनो, व्यक्तो, व्यक्तवाग्व्यक्तशासनः । युगादिकृयुगाधारो युगादिर्जगदाविजः ॥१४७
सिद्धिद- सिद्धि- आत्म्याच्या अनंतज्ञानादि गुणांची परिपूर्णता भक्तांना देतात म्हणून प्रभु सिद्धिद आहेत ॥ ९॥ सिद्धसङ्कल्प- सर्वसंकल्प सिद्ध झाल्यामुळे ते सिद्धसङ्कल्प आहेत ।। १०॥ सिद्धात्मा- जिनदेवाचा आत्मा सिद्धस्वरूपाला प्राप्त झाला. म्हणून ते सिद्धात्मा ॥ ११ ।। सिद्धसाधन- सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यक्चारित्र ही सिद्धीची-मोक्षाची साधने आपणास पूर्ण प्राप्त झाली आहेत. म्हणून आपण सिद्धसाधन आहात ॥१२।। बुद्धबोध्योप्रभूनी जाणण्यास योग्य अशी आत्मादिकांची स्वरूपं जाणली आहेत. म्हणून ते बुद्धबोध्य आहेत ॥ १३ ॥ महाबोधि- वैराग्य व रत्नत्रय प्राप्तीला बोधि म्हणतात. हे दोन ज्यांना फार मोठे प्राप्त झाले आहेत असे प्रभु महाबोधि होत ॥ १४ ॥ वर्धमान- ज्यांच्याठिकाणी अव- सर्व बाजूंनी ज्ञान व पूजा हे वृद्धिंगत झाले आहेत असे प्रभु वर्धमान होत ।। १५ ॥ महद्धिकमोठमोठ्या बुद्धि, तप, विक्रिया आदिक ऋद्धींना प्रभूनी धारण केले आहे. म्हणून ते महद्धिक होत ॥ १६ ॥
वेदाङ्ग- शिक्षा, कल्प, व्याकरण, छन्द, ज्योतिष आणि निरुक्त ही वेदांची सहा अंगे वैदिक मानतात. जैनमतात वेद म्हणजे ज्ञान व तन्मय- अंग म्हणजे आत्मा ज्यांचा असे जे जिनेश्वर त्यांना वेदाङ्ग म्हणावे. अथवा वेद म्हणजे केवलज्ञान त्याची भव्यांना प्राप्ति होण्यास अंग उपाय तो जिनेश्वरापासून मिळतो. म्हणून जिनेश्वराला वेदाङ्ग म्हणतात ॥ १७ ॥ वेदवित्- स्त्रीवेद, पुरुषवेद व नपुंसकवेद या तीन वेदांचे स्वरूप जिनेन्द्र जाणतात म्हणून ते वेदवित् आहेत. पुरुषसेवनाची अभिलाषा होणे तो स्त्रीवेद, स्त्रीसेवनाची अभिलाषा तो पुरुषवेद व उभयांची अभिलाषा होणे तो नपुंसकवेद. अथवा शरीरापासून आत्मा भिन्न आहे असे ज्याने जाणता येते त्याला वेद म्हणतात. अर्थात् भेदज्ञानाला वेद म्हणतात. ते भेदज्ञान ज्यांनी जाणले आहे त्या जिनपतीला वेदवित् म्हणावे ॥ १८ ॥ वेद्य- जिनदेव नित्यज्ञानात नियुक्त आहेत, ज्ञानमय आहेत किंवा योगिजनाकडून नेहमी ते जाणण्यास योग्य आहेत ॥ १९ ॥ जातरूपजन्मसमयाचे रूप ज्यांचे आहे असे अर्थात् नग्नरूप प्रभूचे आहे ॥ २० ॥ विदांवरविद्वज्जनात श्रेष्ठ ॥ २१॥ वेदवेद्य- जिनदेव वेदाने-ज्ञानाने वेद्य- जाणण्यास योग्य आहेत ॥ २२ ॥ स्वसंवेद्य- आत्म्याच्याद्वारे उत्तमरीतीने जिनेश्वर जाणले जातात. इन्द्रियज्ञानाने जिनेश्वरांचे बाह्य शरीर जाणले जाईल. पण आत्मज्ञानाने जिनेश्वर जाणले जातात ॥ २३ ॥ विवेद- विशिष्ट ज्ञानी-केवलज्ञानी ॥ २४ ॥ वदतांवर- वदतां- तार्किक लोकामध्ये वरःश्रेष्ठ प्रभु आहेत ॥ २५ ॥
अनादिनिधन- प्रभूना आदि-जन्म व निधन-मरण हे नाहीत. म्हणून ते अनादिनिधन आहेत. अथवा अनस्य-जीवितस्य आदिः जन्म तत्पर्यन्तं- जीविताचा आदिभाग म्हणजे जन्म,
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org