________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ५.
reveren
अर्थ - ज्यानें आपल्या सदाचाराच्या सुगंधानें सर्वांना सुगंधयुक्त केलें आहे, जो शिष्यांचे मनोरथ पूर्ण करण्याच्या कामांत कल्पवृक्षच की काय ! असा आहे, आपल्या आत्म्याच्या चिच्छक्तिरूपी उदकाच्या योगानें जो भव्यजीवरूपी धान्याला मेघाप्रमाणें आहे, गुणवान् लोक ज्याची सेवा करितात, जो आपल्या भजकांना मुक्तिपद देतो असा, रत्नत्रयाच्या योगानें भूषित झालेला, परलोकांतील उत्तम सुखाला देणारा आणि शिष्यांना सिद्धांतशास्त्रांत पारंगत करणारा असा जो श्रीजिनसेनाचार्य, त्याला मी नमस्कार करतो.
कलियुगकलिहन्ता कुन्दकुन्दो यतीन्द्रो । भवजलनिधिपोतः पूज्यपादो मुनीन्द्रः ॥ गुणनिधिगुणभद्रो योगिनां यो गरिष्ठो ।
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
जयति नियमयुक्तः सिद्धसेनो विशुद्धः ॥ ७ ॥
अर्थ - कलियुगांत उत्पन्न झालेला जो अनेक वाद्यांचा कलह, त्याचा नाश करणारा, सर्वयतीमध्ये श्रेष्ठ असा श्रीकुंदकुन्दाचार्य उत्कर्ष पावत आहे. भवसमुद्रांतून तरून जाण्याची नौकाच कीं काय ! असा मुनींद्र श्री पूज्यपादयति सर्वात महत्व पावला आहे. संपूर्ण योगिलोकांत श्रेष्ठ व सद्गुणांचा समुद्र > असा गुणभद्रमुनि, उन्नतीला प्राप्त झाला आहे. आणि सर्वदा नियमाने वागत असल्यानें पवित्र असा
For Private And Personal Use Only