________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
00000000000000000000000005
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ४. ४ युक्त करीत आहे असें, नऊ प्रकारच्या नयांनी व्यापिलेले व परमतांतील एकांतवाद ज्यांत नसल्याने ? प्रमाणभूत असलेलें असें जे नऊ प्रकारचे तत्त्व, ते ज्याने सात प्रकारच्या व सप्तभंगीच्या प्रयोगाने सर्व है लोकांस स्पष्ट दाखविलें तो शेवटचा जिनपति जो वर्धमानस्वामी त्याला मी नमस्कार करतो.
श्रीभारतीमखिललोकसुखावधारिणी।
मानन्दकन्दजननी जनजाड्यनाशिनीम् ॥ तत्त्वावकाशकरिणी वरबुद्धिदायिनीं।
वन्दे हितार्थसुखसाधनकार्यकारिणीम् ॥५॥ __अर्थ-संपूर्ण जीवांना सुख कोणतें हैं दाखऊन देणारी, त्यांच्या अंतःकरणांत आनंदाचें बीज उत्पन्न करणारी, त्यांचे अज्ञान घालवून त्यांना तत्त्वज्ञान करून देणारी, आणि सर्व जीवांच्या कल्याणाकरितां सुखप्राप्तिरूपी कार्य करणारी, अशी जी सुबुद्धि देणारी वाग्देवता तिला मी नमस्कार करतो.।
चारित्रोज्वलगन्धवासितजनं शिष्येषु कल्पद्रुमं ।
वन्देऽहं परलोकसारसुखदं सिद्धान्तपारप्रदम् ॥ आचार्य जिनसेनमात्मचिदुदैर्भव्यौघसस्यं घनं ।
संसेव्यं प्रगुणैर्गरिष्ठपदं रत्नत्रयालङ्कृतम् ॥ ६॥
For Private And Personal Use Only