Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२५-१३१)
महापुराण
(२९
कृती कृतार्थः सत्कृत्यः कृतकृत्यः कृतक्रतुः । नित्यो मृत्युञ्जयोऽमृत्युस्मृतात्मामृतोद्भवः ॥१३० ब्रह्मनिष्ठः परब्रह्म ब्रह्मात्मा ब्रह्मसम्भवः । महाब्रह्मपतिब्रह्मैट् महाब्रह्मपदेश्वरः ॥ १३१
कृती- निदानदोषाने रहित पुण्य-ज्यांनी उपाजिले आहे असे प्रभु कृती होत. अथवा कृती- विद्वान् अनन्तज्ञानादिचतुष्टयाने युक्त असे प्रभु कृती होत ।। ७८ ॥ कृतार्थ- धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ ज्यांनी सिद्ध केले आहेत असे प्रभु कृतार्थ होत ।। ७९ ॥ सत्कृत्य- ज्यांनी प्रजापालनकृत्य उत्तम रीतीने केले आहे असे प्रभु सत्कृत्य होत ॥ ८० ।। कृतकृत्य:- ज्यानी आत्मकार्य केले आहे ते कृतकृत्य होत. अथवा केले आहे, कृत्य पुण्यकार्य ज्यांनी असे प्रभु कृतकृत्य होत ।। ८१ ॥ कृतऋतु- केली आहे ऋतुः पूजा इन्द्रादिकांनी ज्यांची असे प्रभु कृतऋतु आहेत ।। ८२ ।। नित्य- नेहमी प्रभूचे अस्तित्व राहतेच म्हणून ते नित्य आहेत ।। ८३ ।। मृत्युञ्जय- प्रभुंनी मृत्यूला जिंकून मोक्ष प्राप्त करून घेतला म्हणून ते मृत्युञ्जय आहेत ।। ८४ ।। अमृत्यु-प्रभूना मरण नसल्यामुळे ते अमृत्यु-मृत्युरहित आहेत ।। ८५।। अमृतात्मा- मरणरहित आत्मस्वरूप असल्यामुळे प्रभु अमृतात्मा आहेत ।। ८६ ।। अमृतोद्भवजेथे मरण नाही असे स्थान-मोक्ष आहे व तो मोक्ष भव्यांना ज्यांच्यापासून मिळतो अशा प्रभूना अमृतोद्भव म्हणतात. अथवा मृत-मरण व उद्भव-जन्म हे दोन्ही प्रभूस नसल्यामुळे प्रभु अमृतोद्भव आहेत ॥ ८७॥
ब्रह्मनिष्ठ- ब्रह्म-केवलज्ञान त्यांत जे पूर्णपणे राहतात असे प्रभु ब्रह्मनिष्ठ आहेत ॥८८॥ परं ब्रह्म-परं उत्कृष्ट असे ब्रह्म-केवलज्ञान हेच प्रभूचे स्वरूप आहे ।। ८९ ॥ ब्रह्मात्माकेवलज्ञानादिक गुण ज्यांचे ठिकाणी वाढतात त्याला ब्रह्म म्हणतात. प्रभूचा आत्मा वरील गुणांनी युक्त आहे म्हणून त्याना ब्रह्मात्मा म्हणतात ॥ ९० ॥ ब्रह्मसम्भव- चारित्र, ज्ञान व मोक्ष यांना ब्रह्म म्हणतात व यांची उत्पत्ति व जगात प्रसिद्धि प्रभूपासून झाली म्हणून प्रभूला ब्रह्मसंभव हे नांव आहे ।। ९१ ॥ महाब्रह्मपति- मतिज्ञानापासून मनःपर्यय ज्ञानापर्यन्त चार ज्ञानांना ब्रह्म म्हणतात व पाचवे केवलज्ञान हे महाब्रह्म आहे अशा महाब्रह्म केवलज्ञानाचे प्रभु स्वामी आहेत म्हणून त्यांना महाब्रह्मपति म्हणतात. अथवा सिद्धपरमेष्ठी हे महाब्रह्म आहेत कारण तीर्थकर दीक्षेच्यावेळी नमः सिद्धेभ्यः म्हणून दीक्षा घेतात. यास्तव सिद्धपरमेष्ठी ज्यांचे स्वामी आहेत असे प्रभु महाब्रह्मपति समजावेत. अथवा गणधर, लौकान्तिक देव व अहमिन्द्र यांना महाब्रह्म म्हणावे त्यांचे हे आदिजिनेश्वर पति आहेत म्हणून ते महाब्रह्मपति होत ॥ ९२॥ ब्रह्मेट ब्रह्म- म्हणजे ज्ञान, चारित्र व मोक्ष त्यांचे आदिजिन ईदं- स्वामी आहेत म्हणून प्रभूना ब्रह्मेट म्हणतात ।। ९३ ॥ महाब्रह्मपदेश्वर- महाब्रह्म म्हणजे गणधरादिक ते प्रभूच्या चरणांचा आश्रय घेतात म्हणून प्रभू त्या गणधरादिकाचे प्रभू आहेत. अथवा महाब्रह्मपद म्हणजे समवसरण त्याचे प्रभु ईश्वर स्वामी आहेत म्हणून प्रभूस महाब्रह्मपदेश्वर म्हणतात ॥ ९४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org