Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२५-१२७)
महापुराण
(२७
विनेयजनताबन्धुविलीनाशेषकल्मषः। वियोगो योगविद्विद्वान् विधाता सुविधिः सुधीः ॥ १२५
क्षान्तिभाक् पृथिवीमूर्तिः शान्तिभाक् सलिलात्मकः ।
वायुमूतिरसंगात्मा वह्निमूर्तिरधर्मधक् ॥ १२६ सुयज्वा यजमानात्मा सुत्वा सुत्रामपूजितः । ऋत्विग्यज्ञपतिर्यज्यो यज्ञाङ्गममृतं हविः ॥ १२७
विनेयजनताबन्धु- गुरुकडून जे शिकविले जातात त्यांना विनेय-शिष्य म्हणतात. अर्थात् भव्यजनांच्या समूहाचे प्रभु बंधु आहेत ॥ ३३ ॥ विलीनाशेषकल्मष- संपूर्ण पापांचा नाश केल्यामुळे प्रभु विलीनाशेषकल्मष या नावाला धारण करीत आहेत ॥ ३४ ॥ वियोगमुक्ति स्त्रीबरोबर प्रभूचा विशेष योग संबंध झाला असल्यामुळे हे नाव प्रभूना योग्य आहे ॥३५॥ योगवित्- प्राणायामादि आठ योगाना प्रभु जाणतात म्हणून ते योगवित् आहेत ॥ ३६ ।। विद्वान्- प्रभु ज्ञानसंपन्न आहेत ।। ३७ ।। विधाता- व्यवहारापेक्षेने प्रभु लोकांना जिनपूजादिकार्यात तत्पर करतात ।। ३८॥ सुविधि- शोभन निरतिचार चारित्राचे पालन करणारे आहेत ॥ ३९ ॥ सुधी- प्रभु उत्तम आत्मचिंतन करतात ॥ ४०॥
क्षान्तिभाक्- प्रभु क्षमाशील आहेत ॥४१॥ पृथिवीमूर्ति-पृथ्वी ही ज्यांची मूर्ति शरीर आहे असे प्रभु. हे त्यांचे नांव सहनशीलत्वामुळे किंवा सर्वत्र ज्ञानाच्या व्यापकत्वामुळे आहे ॥४२।। शान्तिभाक्- शान्तिधारणामुळे प्रभु शान्तिभाक् या नांवाने शोभतात ।। ४३ ॥ सलिलात्मकप्रभु मृदुपणामुळे, स्वच्छतेमुळे, कर्ममल नाहीसा केला असल्यामुळे व तृष्णा-आशानाशकत्वामुळे जलात्मक आहेत असे वणिले जातात ॥ ४४ ॥ वायुमूर्ति- प्रभु वायुमूर्ति आहेत. अर्थात् ते जगताचे प्राणरूप आहेत. त्यांची गति रोकता येत नाही असे ते आहेत ॥ ४५ ॥ असङ्गात्माअसंग अपरिग्रह सर्व बाह्याभ्यंतरपरिग्रहांच्या अभावाने त्यांचा आत्मा युक्त आहे. अर्थात् ते अपरिग्रहस्वरूपी आहेत ।। ४६ ।। वह्निमूर्ति- अग्निस्वरूपी आहेत व त्यामुळे ते वह्निमूर्ति आहेत ॥ ४७ ॥ अधर्मधक- अधर्म हिंसादि लक्षण जे पाप स्वतःचे व इतरांचे ते प्रभ भस्म करून टाकतात ।। ४८ ॥
सुयज्वा- कर्मरूपी सामग्रीचा होम करणारे प्रभु सुयज्वा होत ।। ४९॥ यजमानात्माआपल्या अनंतज्ञानादि गुणांची आराधना करणाऱ्या प्रभूना यजमानात्मा म्हणतात ।। ५० ।। सुत्वा- आत्मसुखरूप सागरात स्नान करणारे प्रभु सुत्वा होत ॥ ५१ ॥ सुत्रामपूजित- सुत्रामइन्द्राकडून पूजितः पूजा केली गेलेल्या प्रभूला सुत्रामपूजित म्हणतात ।। ५२ ।। ऋत्विग् ज्ञानादि गुणांची पूजा करणारामध्ये मुख्य आचार्य ॥ ५३॥ यज्ञपति- आत्मयज्ञाचा स्वामी ।। ५४ ।। यज्य- इन्द्राकडून पूज्य झालेला ।। ५५ ॥ यज्ञाङ्गम्-पूजन करण्याचे साधन-सामग्री असलेले प्रभु यज्ञाङ्ग होत ॥ ५६ ॥ अमृतं- प्रभु मरणरहित आहेत. म्हणून ते अमृत आहेत. संसारभोगाची तृष्णा नष्ट करणारे असल्यामुळे प्रभु अमृत आहेत ॥ ५७ ॥ हवि- आपल्या ज्ञानरूपी यज्ञात प्रभुंनी आपल्या अशुद्धीची हवि दिली अर्थात् अशुद्धतारूपी समिधा दग्ध केली ॥५८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org