Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
महापुराण
(२५-१२३
विश्ममुट् विश्वसूट विश्वेट विश्वभुग्विश्वनायकः । विश्वाशीविश्वरूपात्मा विश्वजिढि जितान्तकः ॥ १२३ विभवो विभयो वीरो विशोको विजरोऽजरन् ।।
विरागो विरतोऽसङ्गो विविक्तो वीतमत्सरः ॥ १२४ विश्वमुट- प्रभु चतुर्गति- नरक-पशु-मनुष्य-देव या चार गतीमध्ये होणान्या भ्रमणाला दूर करतात ।। १३ ।। विश्वसृट्- सर्व जगताची व्यवस्था लावणारे प्रभु विश्वसृट् आहेत ।।१४।। विश्वेट- त्रैलोक्याचे स्वामी ॥ १५ ॥ विश्वभुक्-जगताचे भुक्-पालन करणारे आहेत ।। १६ ।। विश्वनायक-- भगवान् त्रैलोक्याचे स्वामी आहेत व ते विश्वाला शुभ कार्यात प्रवृत्त करतात ।।१७ विश्वाशी-- सर्व विश्वावर विश्वासयुक्त अथवा केवलज्ञानाने विश्वात व्यापून राहणारा ॥१८॥ विश्वरूपात्मा-- ज्यामध्ये प्राणी प्रवेश करतात-परिभ्रमण करतात अशा जगाला विश्व म्हणतात. त्या विश्वाच्या स्वरूपाचा आत्मा विश्वाकार आत्मा ज्यांचा आहे असे प्रभु विश्वरूपात्मा होत. अर्थात् लोकपूरण समुद्घाताचे वेळी प्रभूचा आत्मा सर्व विश्वाला व्यापतो. म्हणून त्यांना विश्वरूपात्मा म्हटले आहे अथवा जीयादिक पदार्थ प्रभंच्या केवलज्ञानात शिरले आहेत म्हणन केवलज्ञान विश्व आहे त्या विश्वरूपाचा धारक प्रभूचा आत्मा असल्यामुळे प्रभु विश्वरूपात्मा आहेत ॥ १९॥ विश्वजित्-- संसाराला जिंकल्यामुळे प्रभु विश्वजित् आहेत ॥ २० ॥ विजितान्तक- प्रभुंनी अन्तकाला-मृत्यूला पूर्णपणे जिंकले आहे म्हणून ते विजितान्तक होत. अथवा प्रभु परमपदाला पोहोचल्यामुळे ते विजितान्तक झाले आहेत ॥२१॥ विभव-प्रभूची भवतीर्थकरावस्था ही विशिष्ट असते, सर्वश्रेष्ठ व आदरणीय असते म्हणून त्यांना विभव म्हणतात. अथवा विभव-विगत-नष्ट झाला आहे. भव-संसार ज्यांचा असे प्रभु असतात. अथवा विभाव असाही पाठ आहे. वि-विशिष्ट भाव-परिणाम-शद्धोपयोग ज्यांचा असे प्रभ आहेत. अथवा वि-विशिष्ट-भा-कान्ति तिचे अवति प्रभु रक्षण करतात म्हणून त्यांना विभाव असेही नांव आहे ॥ २२ ॥ विभय- ज्यांची विशिष्ट कान्ति आहे अशा व्यक्तीना विभ म्हणतात. त्यांचा प्रभु यान्ति पराभव करतात. म्हणून जिनेश्वर विभय आहेत, अर्थात् महाकान्तिसम्पन्न आहेत. अथवा प्रभु सात भयांनीरहित आहेत ( इहलोकभय, परलोकभय, वेदनाभय, आकस्मिकभय, अत्राणभय, अगुप्तिभय, अशरणभय ) ॥ २३ ॥ वीर- वि-विशिष्ट-ई लक्ष्मीला-मुक्तीलक्ष्मीला राति जे भक्ताला देतात ते प्रभु वीर होत. 'अथवा कर्मशत्रूला जे वीराप्रमाणे जिंकतात ते प्रभु वीर होत ।। २४ ॥ विशोक- शोकरहित असल्यामुळे प्रभूना विशोक म्हणतात. अथवा विशिष्ट शं सुखयुक्त क: आत्मा ज्यांचा आहे असे प्रभु विशोक अनन्तसुखी आहेत ॥ २५॥ विजर- विनष्ट झाली आहे जरा वृद्धावस्था ज्यांची ते प्रभु विजर होत. अथवा वि-विशिष्ट जरो वृद्ध असलेला. पुराणपुरुष हा अभिप्राय ।। २६ ॥ अजरन्- अ-अतिशय वृद्ध अथवा जो वृद्ध होणार नाही असा प्रभु ॥ २७ ॥ विराग- रागरहित--निरिच्छ ।। २८ ॥ विरत-- विनष्ट झाले आहे रत-- भवसुख ज्यांचे असे अर्थात् विरक्त ॥ २९ ॥ असङ्ग- परिग्रहरहित ॥ ३० ॥ विविक्तसर्व विषयापासून विरक्त झालेला ॥ ३१ ॥ वीतमत्सर- दुसऱ्याचे शुभ पाहून जळफळणे तो मत्सर होय. प्रभु मत्सररहित आहेत. म्हणून ते वीतमत्सर होत ॥ ३२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org