Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२५-१२९)
महापुराण
सहस्रशीर्षः क्षेत्रज्ञः सहस्राक्षः सहस्रपात् । भूतभव्यभवद्भर्ता विश्वविद्यामहेश्वरः ॥ १२१
इति दिव्यादिशतम् ॥७ स्थविष्ठः स्थविरो ज्येष्ठः प्रष्ठः प्रेष्ठो वरिष्ठधीः । स्थेष्ठो गरिष्ठो बंहिष्ठः श्रेष्ठोऽणिष्ठो गरिष्ठगीः ॥ १२२
ज्यांच्या ठिकाणी विशाल द्वादशाङ्गज्ञान आहे त्या भगवंतांना बहुश्रुत म्हणतात ॥ ९० ॥ विश्रुत- ज्यांचे ज्ञान व्यापक असल्याची प्रसिद्धि चोहोकडे झाली आहे असे जिनदेव विश्रुत नांवाने प्रसिद्ध होतात ।। ९१॥ विश्वतःपाद- अधोलोक, मध्यलोक आणि ऊर्ध्वलोक या तीन लोकात ज्यांच्या केवलज्ञानाचे किरण पसरले आहेत असे भगवान् विश्वतःपाद या नांवाने संबोधित होतात ॥ ९२ ॥ विश्वशीर्ष- त्रैलोक्याचा अग्रभाग हे ज्यांचे निवासस्थान आहे असे प्रभु विश्वशीर्ष म्हटले जातात ।। ९३ ॥ शुचिश्रवा- ज्यांचे कान पवित्र आहेत असे प्रभु शुचिश्रवा या नांवाने शोभतात ॥ ९४ ॥
सहस्रशीर्ष- ज्याला अनन्त मस्तके आहेत असे, म्हणजे अनन्तमुखी अनंतज्ञानी प्रभूला सहस्रशीर्ष म्हणतात ।। ९५ ।। क्षेत्रज्ञ- अधो, मध्य व ऊर्ध्वलोकरूपी क्षेत्र व अलोकाकाशाला प्रभु जाणतात म्हणून ते क्षेत्रज्ञ होत ।। ९६ ॥ सहस्राक्ष- अनन्त पदार्थांचे ज्ञान असलेले प्रभु सहस्राक्ष होत ॥ ९७ ॥ सहस्रपात्- ज्यांना हजार पाय आहेत ते सहस्रपात् अर्थात् प्रभूना हजार पाय आहेत असे नांव आहे. त्याचा अभिप्राय त्यांना अनन्तवीर्य आहे असा समजावा ।। ९८ ॥ भूतभव्यभवद्भर्ता- भूतकालीन, भविष्यकालीन व भवत्- वर्तमानकालीन अशा जगताचे आदिप्रभु भर्ता-स्वामी आहेत ॥ ९९ ॥ विश्वविद्यामहेश्वर- विश्वविद्या म्हणजे केवलज्ञान त्याचे प्रभु आदिजिन महास्वामी आहेत ।। १०० ॥
स्थविष्ठ- उत्कृष्ट गुणांच्या अपेक्षेने प्रभु अतिशय स्थूल आहेत म्हणून त्यांना स्थविष्ठ म्हणतात ॥ १ ॥ स्थविर- ज्ञानादिगुणांनी वृद्ध असल्यामुळे प्रभु स्थविर आहेत ॥ २ ॥ ज्येष्ठ- त्रैलोक्यात प्रभु अतिशय उत्तम असल्यामुळे ते ज्येष्ठ आहेत ॥ ३॥ प्रष्ठ- सर्वांचे पुढारी असल्यामुळे त्यांना प्रष्ठ म्हणतात ॥ ४ ॥ प्रेष्ठ- सर्वांना प्रभु अतिशय प्रिय आहेत म्हणून ते प्रेष्ठ होत ॥ ५ ॥ वरिष्ठधी- प्रभूची बुद्धि अतिशय श्रेष्ठ आहे म्हणून ते वरिष्ठधी आहेत ॥ ६ ॥ स्थेष्ठ- प्रभु अत्यन्त स्थिर असल्यामुळे ते स्थेष्ठ आहेत ।। ७ ॥ गरिष्ठ- ते अत्यन्त गुरु आहेत म्हणून त्यांना गरिष्ठ म्हणतात ॥८॥ बंहिष्ठ- गुणांच्या अपेक्षेने ते फारा मोठे आहेत म्हणून त्यांना बंहिष्ठ म्हणतात ॥ ९ ॥ श्रेष्ठ- प्रभु अतिशय प्रशस्त-उत्तम असल्यामुळे श्रेष्ठ आहेत ।। १०॥ अणिष्ठ- प्रभूचे स्वरूप अतिशय सूक्ष्म असल्यामुळे ते अणिष्ठ आहेत ॥ ११॥ गरिष्ठगी- प्रभुंची वाणी अतिशय गौरवयुक्त आहे म्हणून ते गरिष्ठगी आहेत. त्यांची वाणी जगत्पूज्य आहे ॥ १२ ॥ म.४
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org