________________
(१८३१)
पनी त्यांच्या मुलांना त्यांच्या नातवंडांना मिळते. ज्यांनी आपल्या आजोबा पणजोबांना पाहिलेली नाही तरी वारसाहक्काने ती संपत्ती त्यांना मिळते. अगदी त्याचप्रमाणे प्रारंभी अनंत जन्मात या जीवाने पापकर्मे करण्याची साधने तयार करून आला, त्या कर्माशी अजून प्रत्यक्ष संबंध आला नाही तरी पण जोपर्यंत अशा पाप-स्थानांचा मन, वचन, काया या तीन योगाने त्याग केला नाही आणि अव्रताला अवरुद्ध करून व्रतधारण केले नाही तर तोपर्यंत पूर्वी अनंत काळात केलेल्या पापकर्माचा सूक्ष्म प्रवाह अविरतीद्वारे जीवाला वारसा रूपाने मिळत राहतो.
उदाहरणार्थ कोण्या एका जीवाने, जीवांची हत्या करण्याची साधने पूर्वजन्मात जमविली. त्याच्या मृत्यूनंतरही त्याच साधनांचा उपयोग जीवहत्या करण्यात केला जात राहिला जसे तलवार वगैरे तयार करणारा कुठल्या दसऱ्या योनीत जन्मला त्याला त्या हत्यारासंबंधी ह्या जन्मात काहीही माहित नाही. आठवण नाही. कारण गत जन्माची या जन्मात कोणतीच स्मृती नसतेच. तरीही ती शखे त्याने मागच्या कुठल्यातरी जन्मात निर्माण केली होती. त्या हत्यारांचा उपयोग पुढे कोणी तरी करीतच राहिले. त्या हत्यारांचा उपयोग करून जेवढी जीव हिंसा होत राहिली त्या सर्वांच्या पापाचा भागीदार तो निर्माण कर्ता जीव जिथे कुठे असेल तिथे त्याला ते पाप लागते. कारण त्याच्या मनातन त्या हत्यारांचा संबंध तुटला नाही. जोपर्यंत शस्त्रे वापरली जातील तोपर्यंत हिंसा होत राहील, तोपर्यंत पापाचा भागीदार मुख्य बनवणाऱ्याला व्हावे लागेल. याप्रमाणे अनंत जन्माचा नियोजित पापाचा सूक्ष्म प्रवाह आत्म्यात प्रवेश करीत असतो म्हणूनच अविरतीला अवरुद्ध करणारे जी व्रते आहेत त्यांचा स्वीकार करायला हवा.
अविरती (अव्रत) चे बारा प्रकार आहेत. । १) श्रोत्रेन्द्रिय अविरति - कानाचे अशुभ विषयापासून निवृत्त न होणे. (२) चक्षुन्द्रिय - डोळे (३) घ्राणेन्द्रिय - नाक, (४) रसनेन्द्रिय जीभ (५) स्पर्शेन्द्रिय - स्पर्श या पांचांच्या अशुभ विषयापासून निवृत्त न होणे. (६) मन अविरति - विषयात भटकणाऱ्या मनाला न रोकणे. (७) पृथ्वीकाय - पृथ्वीचे जीव, (८) अपकाय - पाण्याचे जीव, (९) तेऊकाय - अग्नीचे जीव, (१०) वाऊकाय - हवेचे जीव (११) वनस्पतिकाय - बनस्पतिचे जीव (१२) त्रसकाय- बेइन्द्रिय तेइन्द्रिय, चउरिन्द्रिय आणि पंचेन्द्रिय जीवांचे रक्षण न करणे.
मनुष्य पाच इन्द्रिय, आणि सहावे मन यांच्या पोषणासाठी, व्रत, मर्यादा
l itsuisines.
Da