________________
तेरो जनम हुवो नहीं जहाँ, ऐसो खेतर नाही कहाँ । पनि याही जनम-भूमी का रचो, चलो निकसी तो विधी से बचो ॥४२८
अर्थात संपूर्ण लोकमध्ये अशी एक पण जागा नाही जेथे तुझा जन्म झाला नाही. कवी बधजन म्हणतात हे आत्मन् ! तु ह्या जन्म भूमीतच का गुरफटला आहे ? जर भवन्धनाने वाचायचे असेल तर त्याचे ममत्व तोड राग सोड ह्याच्यातच तुझी उन्नती आहे. कवी भगवतीदास लिहितात की --
लोक माँहि तेरो कछु नाही, लोक आन तुम आन लखाहि
वह पद्रव्यन को सब धाम, तु चिन्मुरति आतमराय ॥४२९ ह्या जगात तुझे काहीच नाही. जग वेगळे आहे आणि तू वेगळा आहे- हे स्पष्ट दिसून येते; कारण हे जग सहा द्रव्याचे निवास स्थान आहे आणि तू चैतन्यमूर्ती भगवान आत्मा आहे.
_उपरोक्त छन्दात जग आणि आत्मच्या भेदविज्ञानावर आणि वैराग्यभावावर विदशेप जोर दिला आहे. ह्याच्यावरून स्पष्ट होते की लोकभावनेच्या चिंतनात जगापासून विरवततेची मुख्यता आहे.
आतमरूप संवारी मोक्षपूर बसो सदाही । आधि-व्याधि-जर-मरण आदी दुःख हे न कदा ही ।। श्री गुरू शिक्षा धारी टारी अभिमान कुशोका ।
मनधिर कारण यह विचारी निज रूप सुलोका ॥४३० आत्मस्वरूपाचे चिंतन करणे आत्म स्वरूपात रममाण होणे हाच मोक्ष मार्ग आहे. ह्या मार्गावर चालणारेच मोक्षपुरीमध्ये निवास करतात. जेथे आधी-व्याधी जन्म-मरण इत्यादी दुःखपण नसतात. म्हणून अभिमान आणि शोक सोडून श्री गुरूची शिक्षा धारण करा. मनाच्या स्थिरतेसाठी स्वरूप सुलोकमध्ये विचरण करणे हाच एक मात्र उपाय आहे.
याज आत्मज्ञान, आत्मानुभव आत्मश्रद्धान आणि ध्यान; आत्म्याची रमणता हाच एक उपाय आहे.
लोक स्वरूपाचे चिन्तन केल्याने तत्त्वज्ञान इत्यादीची शुद्धी होते. चित्तातून राग देष दूर होतात.४३१