________________
(६४५)
जावेळी माध्यस्थ भाव ठेवणेच हितकर असते. त्याचप्रमाणे अहिताच्या भावनेला न नोटणारे जीव आहेत त्यांच्या बद्दलही माध्यस्थ ठेवणे उभयपक्षी हितकारक असते. या भावनेने वैरभाव रूप चित्तातील मळ दूर होतो.
स. २) वैराग्य विषयक माध्यस्थ्य - वैराग्य अर्थात् वैषयिक सुखाबद्दल अरुचि अथवा द्वेष, असा द्वेष प्रशस्त असल्याने पुण्यानुबंधी पुण्याचा हेतू आहे. परिणामस्वरूप सांसारिक सुखाबद्दल माध्यस्थ्य अर्थात रागरहित द्वेषाचा अभाव निर्माण होतो.
सुखाबद्दल द्वेष तथा दुःखाबद्दल राग हे सुद्धा प्रशस्त मनोभाव असल्याने पण्यानुबंधी पुण्याचा हेतू बनून परिणाम स्वरूप माध्यस्थ्य भाव उत्पन्न करतो. वैपयिक सूखाच्या मागे जन्ममरणाच्या परंपरेचा विचार केल्याने सुखाबद्दल अरती आणि दुर्गतीच्या दःखांना दूर करण्यात कारणीभूत आहे. अशाप्रकारे विचार केल्याने दुःखाबद्दल अरतीभाव उत्पन्न होत नाही.
३) सुख विषयक माध्यस्थ्य - तीर्थंकरांचा शेवटचा जन्म, अणुत्तरवासी देव, धन्ना, शालिभद्र, तथा गुणसागर इ. पुण्यानुबंधी पुण्याचा उपभोग करणारे महापुरुष सुखाचा उपभोग इच्छारहित होऊन करत होते. त्यांना समजत होते की, माझ्या पूर्वकृत शुभ कर्माचा उदय आहे. अशाप्रकारे सुखाबद्दल माध्यस्थ्यता महायोगी पुरुषांमध्येच असते.
___४) दुःख विषयक माध्यस्थ्य - या माध्यस्थ्य भावनाचे आराधक आदर्श आहेत. भगवान महावीर, श्री गजसुकुमाल मुनी, खंदकमुनी इ. ज्यांनी मरणास उपसर्गात (दुःख)ही माध्यस्थ्य भाव धारणा केला आणि न दुःख देण्याऱ्याबद्दल द्वेष केला आणि सुख देणाऱ्याबद्दल ही राग भाव ठेवला नाही.
५) गुणविषयक माध्यस्थ्य - हा माध्यस्थ्य लब्धिप्रात असलेल्या मुनींना होतो. ते विचार करतात की, 'क्षयोपक्षमभाव' ही आत्म्याची अपूर्णता आहे. यात आनंद कसा मानायचा ? लब्धी, सिद्धी इत्यादी तर क्षयोपक्षम भावनाची आहे, असा विचार करावा की, ते आपल्या लब्धिप्रती माध्यस्थ्य राहतात.
) मोक्ष विषयक माध्यस्थ्य - हा भाव अप्रमत्तादी गुणस्थानात प्रकट होतो. पास असंग अनुष्ठान सुद्धा म्हणतात. त्यावेळी आत्मा समतारूपी अमृत-महासागरात मस्त असते.
७) सर्वविषयक माध्यस्थ्य - हा माध्यस्थ्य भाव केवली भगवंतांना असतो कवला भगवंतांनी निर्दिष्ट केलेल्या तत्त्वांचा अनेकांत दृष्टीने चिंतन करणाऱ्या महात्मांना