________________
(६८६)
द्वेष भाव उत्पन्न होत नाही आणि कुणी पूजा अर्चना केली तरी त्याच्या प्रती अहोभाव होत नाही. ह्या दोनी परिस्थितीत ते समभावात रहातात. घात केला गेला तरी ते दुःखी होत नाही व पूजा केली तरी सुखी होत नाही. सन्मान केले अथवा अपमान केले तरी त्यांना त्याचा काहीच परिणाम होत नाही, ते गुणात्मक, दोषात्मक, निंदात्मक वृत्तीने सर्वथा रहित असतात. मात्र आत्मभावान स्थित राहातात.
आत्मविकासासाठी सत्याचा स्वीकार तर परमावश्यक आहे. आणि त्याचबरोबर ज्ञान-अज्ञान रूपाने काही चुका झाल्या असतील तर प्रायश्चित किंवा आत्मग्लानी होणे पण आवश्यक आहे. ही आंतरिक शुद्धी पवित्रताचे अनन्य साधन आहे. ७७
आत्मतत्त्वाचा बोध होण्यात गुरू दीपकाप्रमाणे पथप्रदर्शक असतात. आत्मसाक्षात्कार करतात, अज्ञजन किती श्रम करतात वाचतात, बोलतात घशाला कोरड पडेस्तोवर बोलतात. तरीही आत्म्याच्या शुद्धभावाचे यथार्थ ज्ञान त्यांना प्राप्त होत नाही. जो आत्मस्वरूपाचे त्या संबंधीचे एकच अक्षर वाचून चिंतनात उतरवतो तो मोक्ष प्राप्त करून जातो. सर्व बंधनातून त्याची मुक्ती होते. ७८
कबीर आत्म्याच्या शुद्धभावाच्या साक्षात्काराकडे प्रेरित करताना म्हणतात पुस्तके वाचून लोक मरत आहेत. वाचण्यात सारे जीवन घालवतात. पण कोणी ज्ञानी होत नाहीत. ज्याने परमात्म्याचा आत्म्याच्या शुद्धभावाचे एक अक्षर जरी वाचले थोडा जरी साक्षात्कार झाला तर तो आत्मज्ञानी बनतो. ७९
कबीराचा आशय असा आहे की, पुस्तकी ज्ञान कितीही प्राप्त केले. परंतु । आत्म्याच्या शुद्ध भावात जोपर्यंत परिणमन होत नाही तोपर्यंत त्या अध्ययनाची काहीच सार्थकता नाही. कबीराच्या सांगण्यानुसार अनेक अनेक ग्रंथ वाचणे म्हणजे पांडित्य नव्हे, पांडित्य तर तेव्हा सिद्ध होते जेव्हा आत्म्याची शुद्धानुभूती होते.
रागाने (आसक्तीने) रंगलेल्या हृदयात प्रशांत आत्मदेव दृष्टिगोचर होत नाही. ज्याप्रमाणे धुळीने माखलेल्या आरशात प्रतिबिंब दृष्टिगोचर होत नाही, त्याचप्रमाणे रागाने रंगलेल्या हृदयात शांत शुद्ध आत्मारूपी देवाचे दर्शन होत नाही. अर्थात शुद्ध आत्मानुभूती किंवा साक्षात्कार तेव्हाच होतो जेव्हा हृदयात राग इ. वैभाविक मालिन्य नसेल. ८०
शुद्धोपयोगमय आत्मस्थिती तेव्हा सिद्ध होते, जेव्हा रागादी भावनांचा सर्वथा उन्मूलन होईल.