Book Title: Jain Darshan Bhavna Part 02
Author(s): Punyasheelashreeji
Publisher: Sanskrit Pragat Adhyayan Kendra

View full book text
Previous | Next

Page 334
________________ SHANAND (७२२) thinkiaasuriaNDalichwNICSONSHINABRINISNAGAjabARASNA कोणाचे रक्षण करू शकत नाही. ज्याप्रमाणे भौतिक वस्तू अनित्य असल्याने शाश्वत सुख देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे दुःख दूर पण करू शकत नाही. शरणरूप पण होऊ शकत नाही. लहानबाळ आईच्या शरणात राहतो, विद्यार्थी शिक्षकांच्या शरणी जातो, रोगी डॉक्टरांच्या शरणी जातो अशाप्रकारे वेगवेगळ्या दृष्टीने अनेक जीव एक दुसऱ्याच्या शरणी जातात. पण त्या सर्वांचे रक्षण होतेच असा नियम नाही. रोग्याच्या पापकर्माचा उदय असला तर वैद्य आणि डॉक्टर पण हात झटकून टाकतात. पुण्योदय असेल तरच रक्षण मिळू शकते. धन, स्वजन, स्नेही आणि बळ इत्यादी कोणीच जीवाला आपत्तीने अथवा मृत्यूने वाचवू शकत नाही. संसार दुःखाच्या अग्नीत होरपळत आहे. कोठेही सुख नाही. झोपडीत राहणारे अभावाने ग्रस्त, कष्टाने व्याकूळ आहेत; तर सोन्याच्या महलात राहणारे आपल्या वेगळ्याच दुःखाने प्रकंपित आहेत. संसारात कोणताही पदार्थ माणसाला शरण देण्यास समर्थ नाही. तरीही अज्ञानी मनुष्य जगातील वस्तू आणि व्यक्तींच्या मागे भ्रांत आहे. त्यातच सुख आणि आधार शोधत आहे. पण शेवटी मृत्यू तर येणारच. लाचार जीवत्म्याला ओढून नेणारच. आपल्या आत्म्याशिवाय कोणीही शरणरूप नाही म्हणून साधकाने सांसारिक आश्रयस्थानापासून पराङ्मुख होऊन आत्म्याची शरण घ्यावी. आत्मा सर्वतः स्वतंत्र आहे. आत्म्याशिवाय जितका अनात्म भाव आहे त्याला शरण किंवा सहारा मानणे अज्ञान आहे. ज्ञानाच्या आधाराने मनुष्याला संसाराच्या पदार्थांचा तथा आत्म्याचा यथार्थ बोध प्राप्त होतो. मग तो समजतो की जगात सर्वात श्रेष्ठ आश्रय किंवा शरण फक्त परमात्माच आहे. आणि तो प्राप्त करण्याचा मार्ग सदधर्माचरण आहे. त्यानेच परम शांती प्राप्त होते. जैन धर्मानुयायी भगवान महावीरांचे भक्त म्हणतात- “अरिहंते शरणं पवजामि सिद्धे शरणं पवजामि" मी अरिहंताचे शरण स्वीकार करतो. मी सिद्धांचे शरण ग्रहण करतो. महावीरांचे युग तर्काचे युग होते. भगवान जर म्हणाले असते की 'माझ्या शरणी या तुमचे कल्याण होईल' तर उलट-सुलट तर्काच्या बाणाने भगवानांवर अहंकाराचा आरोप केला असता, म्हणून महावीर ह्या बाबतीत मौन राहिले. आजचे युग वक्र आणि जड बुद्धीचे आहे. 'माझ्या शरणी या' असे म्हटल्यावर तर मोठी समस्या झाली असती. इतकेच काय PRINEETTE

Loading...

Page Navigation
1 ... 332 333 334 335 336 337 338 339 340 341 342 343 344 345 346 347 348 349 350 351 352 353 354 355 356 357 358 359 360 361 362 363 364 365 366