________________
मानवता वरदानरूप बनते. भावोद्वेलित हृदयाने अनुशासित बुद्धी आध्यात्मिकतेच्या समन्वयाने चालते. अशा स्थितीत जीवात्मा संसारात राहून पण दुःखी होत नाही. दुसऱ्यांनाही दुःखी करीत नाही. आज आवश्यकता आहे. अमृताने भरलेल्या हृदयाला अमृतमयच ठेवण्याची तो अमृताचा झरा सुकू नये म्हणून प्रत्येक व्यक्तीव्यक्तिने चिंतन करावे की “माझे मन सात्त्विक भावनेने ओतप्रोत आहे'' अशा भावनेला सतत रममान व्हावे. परिणामस्वरूपी व्यवहारात माधुर्यता, प्रियता आणि श्रेयस्कर्ता प्रस्फुटित होईल.
____ एक भावनामूलक वातावरण निर्माण करावे की ज्यामुळे लोकांना हे निश्चितरूपाने लक्षात येते की बाह्य सुखसाधन सामग्री म्हणजे खरे सुख नव्हे. भौतिक सुख नष्ट होणारे आहे. जे आज प्राप्त आहे ते उद्या आपल्याजवळ राहिलच याची खात्री नाही. 'सांसारिक सुख मिळाले म्हणजे सर्व काही मिळाले' अशा विचारांचा प्रस्ताव जीवावर नसावा. सत्यकाय आहे ते समजून घेणे. मनात चालणारे शुभाशुभ विचार धारेचे परिणाम शुद्ध शुद्धतर, शुद्धतम होत राहिले म्हणजे सांसारिक भावनेतून निवृत्त होऊन. मानवाचे खरे अलंकार रूप गुण आहेत त्यांचे संवर्धन होईल. पवित्र भाव प्रत्येक कणाकणांत पसरले जातील असे केल्याने समाज परिपुष्ट होईल. भावनांचा सतत अभ्यास निःसंदेह पवित्र वातावरण सर्जन करण्यात सफल भूमिका प्रस्तुत करेल अशी आशा आहे.
भावना या संकल्पनेच्या अमूर्त पैलूंचे समूर्त स्वरूप साकार करण्याचा उद्देश सफल ठरावा. साधकांना भावनाविषयावरील मार्गदर्शन सहज उपलब्ध व्हावे हीच भावना.