________________
बनवतो. साधनामार्गावर पुढे जाण्यासाठी त्यास पुण्यवृद्धीमूलक शुभोपयोग पण क्रमश: मंद मंदतर आणि मंदतम करीत-करीत शुद्धतेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करायचा असतो. कारण जीवत्माचा परम लक्ष्य शुद्धावस्ताप्रत पोहोचण्याची आहे. त्याला मात्र शुभमूलक मध्यवर्ती साधनेतच रहायचे नाही.
मनुष्य एकाएकी अशुभ व शुभाचा त्याग करून शुद्ध अवस्थेत पोहोचेल असे शक्य नाही. अशी झेप एकदम उच्च कोटीच्या महापुरुषांनाच घेता येते. सामान्य व्यक्ती तर क्रमाक्रमाने प्रगती करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. म्हणून अशुभाचा त्याग आणि शुभाचे संमार्जन करीत करीत साधक लक्ष्याभिमुख होतो. ही अशी एक पद्धती आहे ज्याच्यावर चालणारा सहसा विफल होत नाही.
शुद्धभावनेपर्यंत पोहोचण्याचे प्रत्येक साधकाचे लक्ष्य आहे. म्हणून आत्म्याचे शुद्धभावमय परिणमन आणि तेथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला उद्बोधन देण्याच्या दृष्टीने सातव्या प्रकरणात शुद्ध भावनेचे विवेचन केले आहे. त्याची ग्राह्यता आणि आदेयतावर माझे विचार उपस्थित केले आहेत. शुद्ध भावनेचे पुन्हा पुन्हा अनुभावन स्मरण, अभ्यासाने, निःसंदेह जीवनसारिणीमध्ये क्रमशः असे एक वळण येऊ शकते, की ज्यामुळे अशुभाची लोहयुक्त शृंखला आणि शुभाची स्वर्णमय शृंखलेच्या गाढ बंधनातून मानव स्वतःच मुक्त होऊ शकतो..
___ मागील पृष्टात प्रस्तुत शोधप्रबंधात जे गवेषणात्मक विवेचनाचे संक्षेपात विहंगावलोकन केले त्याच्या संदर्भात ज्या विषयांचे मुख्य महत्त्व आहे त्याचे विशेष रूपाने आलोचन, प्रत्यालोचन केले गेले आहे.
विवेकशील मनुष्य आपल्या सुप्त शक्तीला व्यक्त करण्यासाठी मार्ग शोधतो तेव्हा त्याला सर्वप्रथम भावनेचा आधार घ्यावा लागतो. ह्या भावनेला जेव्हा अंतर पराक्रमाची जोड मिळते तेव्हा त्यात विचारोद्रेक होतो. त्यावेळेस आपल्या आत्मिक शक्तीला जागृत करण्यासाठी अंतरर्भावमय आध्यात्मिक स्पंदन होते. एक नवी प्रेरणा उद्भूत होऊ लागते, तेव्हा त्या मानवास अत्यंत उत्साह आणि उत्कंठेने भावनेचा आधार घ्यायला पाहिजे. भावनेच्या सतत अभ्यासाने निश्चितच त्याच्या मनात एक अंतर:ज्योती जागते. जो नित्यअनित्य, एक-अनेक, सम्यक्-मिथ्या, संसारमोक्ष, कर्म बन्ध-कर्म संवरण अथवा निर्जरा इत्यादींचा अभ्यास करतो त्याला जीवनाचे वास्तविक सत्य-लक्ष्य काय आहे याचा बोध होतो. त्याची दैनंदिन जीवन, प्रवृत्ती सहजतः अशी होते की ज्यामुळे सदाचार, नीती,