________________
(७३६)
आत्मभावनेचे सतत चिंतन केले पाहिजे आत्मगुणांचा विकास कसा करावा ह्याच दिशेत पुरुषार्थ करणे साधकाचे कर्तव्य आहे.
श्रीमद् राजचंद्रजी यांनी यथार्थच सांगितले आहे की 'आतम भावना भावना जीव लहे केवलज्ञान रे' अर्थात आत्मभावनेचा विकास करण्यासाठी केलेला पुरुषार्थ साधकाला केवळज्ञान प्राप्त करवितो. आणि केवळज्ञान प्राप्त झाल्यानंतर काहीच प्राप्त करणे शिल्लक रहात नाही. आचारंगसूत्राच्या प्रथम श्रूतस्कंधाच्या चौथ्या उद्देशकात लिहिले आहे- 'जे एगं जाणइ ते सव्वं जाणइ' जो 'एक'ला जाणतो- ओळखतो तो सर्वांना जाणतो. अश्याप्रकारे सर्व भावनांपेक्षा आत्मभावना श्रेष्ठ आहे असे ज्ञानी महापुरुषांचे मत आहे. आत्मभावना सर्व भावनांचे सर्वोच्च शिखर आहे. साधना मार्गावर पुढे जाणाऱ्या साधकाचे अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार अथवा आत्म्याच्या वास्तविक स्वरूपाचा यथार्थ परिचय मिळवण्याचाच असतो आणि म्हणूनच -
अशुभ मधून शुभ आणि शुभ मधून शुद्धता कशाप्रकारे प्राप्त करून शकू ह्याची सतत जागृती या शुद्धात्मभावनेच्या चिंतनाने राहाते.
___ परमकल्याणकारी जगाच्या जीवमात्रांचे कल्याण करणारी ही शुद्धभावना जैन धर्माची विश्वाला दिलेले अमूल्य भेट आहे. जैन धर्म एक विशाल धर्म आहे. कोणत्याही जातिपातिच्या सीमेचे बंधन इथे नाही. जगाच्या कोणत्याही कान्याकोपऱ्यात असलेल्या मानवाचे आणि जीवमात्राचे कल्याण कसे होईल क्रमिक चिंतन मार्गदर्शन ह्या भावनेत आहे. आणि शुद्ध भावनेच्या शिखरावर स्थापित करून देण्याची आदर्श प्रवृत्तीचा अविश्कार ह्या भावनेत आहे. अशा भावना सर्वांनी सम्यक् प्रकारे समजून परमशांती व परमसमाधी प्राप्त करावी हीच भावना.
प्रस्तुत प्रबंधात अशुभ शुभ व शुद्ध भावनेचे क्रमिक वर्णन केले आहे. अशुभता तर सर्वथा त्याज्यच आहे. परंतु शुभ ग्राह्य करण्याची सुद्धा सीमा आहे. शुभ म्हणजे पुण्य. त्याच्या फल स्वरूपी लौकिक, भौतिक अनुकूलता, सुखे प्राप्त होतात. परंतु ह्या क्षणिक सांसारिक सुखात मशगुल होऊन अहंकार आला तर पतन निश्चित आहे. जर अनासक्त भावनेने सुखोपभोग केला तर मुमुक्षूच्या दृष्टीने सर्वथा निर्दोष जरी नसला तरी फारसे बाधक पण नाही. त्याच्याबरोबर धर्मानुष्ठान असले तर हिला आत्मसाधनेची मध्यवर्ती स्थिती म्हणता येईल. या शुभभावनेने जे पुण्य प्राप्त होते त्या पुण्यामुळे प्राप्त अनुकूलता एकांत पापाचे संवर्धन करत नाही. त्या पुण्यात्मक प्रवृत्तीला आत्मसाधनेत सहाय्यक