________________
(७३४)
आणि असा निर्धार केला पाहिजे की माझे हृदय दयाळू झालेच पाहिजे. मी कोणत्याही दुःखाची उपेक्षा करणार नाही. शक्ती असेल तर मदत करील ते शक्य नसेल तर त्याला आश्वासन तर नक्कीच देईल. कारण नमामि नारायणं नरं करुणायम्
ज्याच्यामध्ये करुणा आहे त्याला नारायण पण नमस्कार करतात.
माध्यस्थ्य भावना - कोणत्याही परिस्थितीत अर्थात हर्ष अथवा शोक, सत्कार, सन्मान अथवा अपमानाच्या प्रसंगी समभावात राहणे माध्यस्थ भावना आहे.
आपल्या हितशिक्षेची कोणी अवगणना केली तरी चित्तवृत्ती विचलित होता कामा नये.
या भावनेचा अभ्यास करणारा प्राणांत कष्ट आले तरी ते विचलित होत नाहीत आणि ह्या भावनेत पराकाष्टा करणारा साधक वीतराग दशेला प्राप्त करतो.
उदासीनवृत्ती ठेवणे अथवा उपेक्षाभाव ठेवणे पण माध्यस्थ्यभावच आहे. उदासीनवृत्ती ठेवणारा कधी पापकर्म करत नाही. त्याला पापाच्या प्रती तिरस्कार आहे पण पापीच्या प्रती माध्यस्थता असते. चारही भावनेत माध्यस्थ्य भावना सर्वोपरी आहे. मैत्री, प्रमोद, करुणा भावना साधकाला माध्यरथ्य भावनेपर्यंत पोहचण्यासाठी सहायक होते. माध्यस्थ्य भावना सर्व दुःखांचा नाश करणारी आहे.
जैन धर्मात तीर्थंकारांनी वेगवेगळे धर्माचे प्रकार सांगितले आहेत. त्या धर्माच्या द्योतक ह्या चार भावना आहेत.
मैत्रीभावना अहिंसा धर्माची, प्रमोदभावना विनय धर्माची, करुणाभावना दयाधर्माची व माध्यस्थ्य भावना समताधर्माची द्योतक आहे.
ह्या चार भावनांच्या चिंतनाने आत्मस्वरूपाची श्रद्धा म्हणजे सम्यग्दर्शन प्राप्त होते. विषयभोगाची आसक्ती दूर होते. आत्मशांतीचा अनुभव होतो.
मानवधर्माला अर्थात मानवतेला जिवंत ठेवण्यासाठी भावना रसायनाची फारच आवश्यकता आहे. मानवतेचे काम मात्र बोलल्याने होत नाही. त्याच्यासाठी तश्या प्रकारची वृत्ती व प्रवृत्ती दोन्हींचे परिवर्तन करायला पाहिजे आणि ते परिवर्तन भावना रसायनाद्वाराच शक्य आहे.
___ मैत्री, प्रमोद, करुणा आणि माध्यस्थ भावना जीवनाच्या वृत्ती आणि प्रवृत्तीला सन्मार्गी नेण्याचे काम करतात. ज्याच्या वृत्ती आणि प्रवृत्तींवर मैत्र्यादी भावनेची सावली